सिंदेवाही तालुक्यासाठी ४० कोटींचा निधी मंजूर

By admin | Published: September 21, 2016 12:52 AM2016-09-21T00:52:06+5:302016-09-21T00:52:06+5:30

सन २०१६-१७ या वर्षात सिंदेवाही तालुक्यात विविध विकास कामांसाठी ४० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, ...

Rs. 40 crores sanctioned for Sindvehi taluka | सिंदेवाही तालुक्यासाठी ४० कोटींचा निधी मंजूर

सिंदेवाही तालुक्यासाठी ४० कोटींचा निधी मंजूर

Next

विजय वडेट्टीवार यांचे प्रयत्न : शासनाकडून प्रशासकीय मंजूरी प्रदान
सिंदेवाही : सन २०१६-१७ या वर्षात सिंदेवाही तालुक्यात विविध विकास कामांसाठी ४० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती ब्रह्मपुरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते सिंदेवाही येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षात विकास कामे अल्प प्रमाणात झाली असल्याने सिंदेवाही तालुक्याचा पाहिजे, त्या प्रमाणात विकास झालेला नाही. सिंदेवाही तालुक्यातील रस्ते, पूल, डांबरीकरणाचे कामे मंजूर झाली असून लवकरच भुमिपूजन समारंभ होणार आहे. आपल्या प्रयत्नाने सिंदेवाहीला नगर पंचायतीचा दर्जा मिळाला. विकास कामात उमरेड भिवापूर, सिंदेवाही, मूल राज्य मार्ग क्रमांक ९० कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण (८० लाख ७९ हजार रुपये) पिपर्डा-पारणा-वासेरा-मोहाळी-पेटगाव रोड १३२ कि.मी. रस्त्याचे बांधकामे (३३ लाख ४१ हजार रुपये) चिमूर-नेरी-नवरगाव- सिंदेवाही-आरमोरी रस्त्याचे डांबरीकरण (१ कोटी ४ लाख रुपये) पिपर्डा-पारणा-पेटगाव-राजोली रस्त्याचे डांबरीकरण (२४ लाख ११ हजार) रुपये, पिपर्डा-पारणा- मोहाळी रस्त्याचे डांबरीकरण (३१ लाख ५१ हजार रुपये), मुरमाडी-कळमगाव-कुकडहेटी रस्त्याचे डांबरीकरण (२३ लाख २७ हजार रुपये) विरव्हा ते पेटगाव सिमेंट क्राँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे (३६ लाख ९६ हजार रुपये), रामाळा-गडबोरी-वासेरा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण (२३ लार ५७ हजार रुपये), मरेगाव तुकूम ते गुंजेवाही रस्त्याचे डांबरीकरण (४३ लाख ३१ हजार), नांदगाव ते देलनवाडी रस्त्याचे डांबरीकरण (२३ लाख ९२ हजार रुपये), रत्नापूर- खांडला रस्त्याचे डांबरीकरण (४२ लाख ७५ हजार रुपये), रामाळा - वानेरी-वाकल-टेकरी रस्त्याचे डांबरीकरण (३६ लाख १६ हजार रुपये), टेकरी-सामदा रस्त्याचे डांबरीकरण (२३ लाख ६१ हजार रुपये), सिंदेवाही ते पाथरी निफंद्रा रस्ता (२२ लाख ५० हजार रुपये), मरेगाव-गुंजेवाही रस्ता लहान पुलाचे बांधकाम (५० लाख), टेकरी वाकल रस्त्याचे डांबरीकरण (८ लाख ६० हजार रुपये), मोहाळी गावामध्ये सिमेंट रस्त्याचे बांधकाम (१२ लाख ५० हजार रुपये) आदी कामे केली जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हा महासचिव हरिभाऊ बोरकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण कोलते, शहरध्यक्ष राहुल पटेल, सहकारी राईस मिलचे अध्यक्ष प्रा. घनश्याम सोनवाने, सुनील उट्टलवार उपस्थित होते. (पालक प्रतिनिधी)

Web Title: Rs. 40 crores sanctioned for Sindvehi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.