आरटीआय कार्यकर्ता अजय तुम्मेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:19 PM2018-09-07T23:19:05+5:302018-09-07T23:19:23+5:30
येथील आरटीआय कार्यकर्ता अजय पद्माकर तुम्मे (४५) याला दोन लाख रुपयांची लाच घेताना सावली पोलिसांनी रंगेहात पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : येथील आरटीआय कार्यकर्ता अजय पद्माकर तुम्मे (४५) याला दोन लाख रुपयांची लाच घेताना सावली पोलिसांनी रंगेहात पकडले.
पोलीस सूत्रानुसार, सावली तालुक्यातील साखरी घाटावरुन रेतीची वाहतूक सुरू आहे. त्याबाबत अजय तुम्मे याने माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी संबंधिताकडून चार लाख रुपयांची मागणी केली होती. दरम्यान, दोन लाख ५० हजार रुपयात बोलणी झाल्यानंतर ५० हजार रुपये आठ दिवसांपूर्वीच देण्यात आले. त्यानंतर दोन लाख रुपये शुक्रवारी देण्याचे ठरले. अशी तक्रार सावली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. सावली पोलिसांनी सापळा रचून अजय तुम्मे याला दोन लाख रुपये घेताना तालुक्यातील खेडी येथील वसीनच्या धाब्यावर रंगेहात पकडले.
यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ता अजय तुम्मे याने तक्रार मागे घेण्यासाठी चार लाख रुपयांची लाच मागितली. सदर आरोपीने आतापर्यंत अनेक ठिकाणी माहितीचा अधिकार टाकून खंडगी वसूल केल्याचे बोलले जात आहे. आरोपीच्या अशा प्रकाराने अनेकजण त्रस्त झाल्याचे सांगितले जाते. सदर आरोपीविरूद्ध भांदविच्या कलम ३८४, ३८५ अंतर्गत गुन्हा दाखल अटक करण्यात आली.