आरटीओ कार्यालय झाले ‘आॅनलाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2017 12:55 AM2017-04-12T00:55:38+5:302017-04-12T00:55:38+5:30
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवाना काढणे, परवान्याचे नुतनीकरण करणे, पत्त्यात बदल करणे ....
पहिल्या शिकाऊ परवान्याचे वितरण : सारथी ४.० प्रणालीचा वापर
चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवाना काढणे, परवान्याचे नुतनीकरण करणे, पत्त्यात बदल करणे अशी विविध कामे आता आॅनलाईन करण्यासाठी सारथी ४.० हे नवीन व्हर्जन मंगळवारपासून चंद्रपुरातील उपप्रादेशिक कार्यालयात कार्यान्वीत करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या शिकाऊ परवान्याचे वितरण मंगळवारी दुपारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व प्रक्रिया आॅनलाईन झाली असल्याने परवान्यासाठी कार्यालयात चकरा मारणे आता बंद होणार आहे.
सर्व उपप्रादेशिक कार्यालयात सारथी ४.० चा वापर करुन आॅनलाईन कामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यानुसार परिवहन डाट जीओवी डाट इन हे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये सर्व आरटीओ व उपप्रादेशिक कार्यालय एकमेंकाना जोडण्यात आले आहे. यावर शिकाऊ परवाने, कायमस्वरुपी परवाने, व्यावसायिक परवाने, टॅक्स, मोठ्या वाहनाचे परवाने, ॅफॅन्सी नंबर आदींची माहिती उपलब्ध राहणार आहे. त्यामध्ये शिकाऊ परवाना व परमानंट परवाना बाबत अपार्इंटमेंटची सोयही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सोबतच आवश्यक कागदपत्र स्कॅन करुन अर्जासोबत डाऊनलोड करता येणार आहेत. तसेच उमेदवाराने जर त्यामध्ये आपला मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकला तर त्यांना स्टेटससुद्धा कळणार आहे. चंद्रपुरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंगळवारला पहिल्या शिकाऊ परवान्याचे वितरण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोटार वाहन निरिक्षक तुकाराम सपकाळ, सहायक निरिक्षक संजय आळे, प्रणाली प्रशासक, सुलभा चव्हाण, सुनिल बागेसर आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
दलालांपासून होणार मुक्ती
आरटीओ कार्यालयात परवाना काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना दलाल गाठून त्यांच्याकडून शिकाऊ परवाना काढण्यासाठी ५०० ते ६०० रुपये तर परमानंट परवाना काढण्यासाठी एक हजार रुपयांच्या जवळपास दलाल घेत होते. मात्र आता आॅनलाईन पद्धती आल्याने नागरिकांचे काम घरबल्या होणार आहे. त्यामुळे नागरिकांची दलालापासून होणारी लूट थांबणार आहे.
सारथी ४.० ही विकसीत यंत्रणा मंगळवारपासून कार्यान्वीत करण्यात आली आहे. ही प्रक्रिया सोपी असल्याने अर्ज करणाऱ्यांचे काम सोपे झाले आहे. काही दिवसांत ही प्रक्रिया कॅशलेस होणार आहे. सारथी ४.० व अर्जदार आपले सर्व कामे घरबसल्या करु शकणार आहेत. त्यामुळे अर्जदारांना ही प्रक्रिया सोईस्कर ठरणार आहे. तर वाहनाच्या नोंदणीसाठीही नवी आॅनलॉईन प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
- विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर.