खडसंगीत बोगस डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:40 PM2018-11-21T22:40:38+5:302018-11-21T22:41:17+5:30

मागील आठवड्यात ‘लोकमत’ने खडसंगीत सुरू असलेल्या स्टेरॉईड या आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या औषधांच्या काळाबाजाराची धक्कादायक माहिती उघडकीस आणली होती. खडसंगी गावातील खासगी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांपैकी निम्मे डाक्टर बोगस असल्याची खळबळजनक माहिती आरोग्य विभागाने एका माहिती अधिकार याचिकाकर्त्याला दिली आहे.

Rug doctor bogs | खडसंगीत बोगस डॉक्टर

खडसंगीत बोगस डॉक्टर

Next
ठळक मुद्देमाहिती अधिकारातून उघड : आरोग्य विभागाचीच माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : मागील आठवड्यात ‘लोकमत’ने खडसंगीत सुरू असलेल्या स्टेरॉईड या आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या औषधांच्या काळाबाजाराची धक्कादायक माहिती उघडकीस आणली होती. खडसंगी गावातील खासगी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांपैकी निम्मे डाक्टर बोगस असल्याची खळबळजनक माहिती आरोग्य विभागाने एका माहिती अधिकार याचिकाकर्त्याला दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातील ३२ गावातील ३४ हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी आहे. यात ते अपयशी ठरत आहेत. खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील नोंदणीकृत व बिगर नोंदणीकृत (बोगस) डॉक्टरांची यादी एका व्यक्तीने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत आरोग्य विभागास मागितली होती. या अर्जदारास दिलेल्या माहितीत आरोग्य विभागाच्या खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत वैद्यकीय अधिकारी यांनी खडसंगी गावात सहा खासगी वैद्यकीय व्यावसायिक बोगस असल्याची माहिती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीकृष्ण नन्नावरे यांनी माहितीच्या अधिकारात अर्जदाराला दिली आहे. सोबतच काही नामवंतही डॉक्टर गावात आहेत.
रुग्ण कल्याण समिती नावालाच
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत परिसरातील रुग्णांच्या कल्याणासाठी समिती स्थापण्यात आली आहे. जि. प.क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य या समितीचे अध्यक्ष असतात. या समितीत लोकप्रतिनिधींसह, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक व स्थानिक नागिरक यांचा समावेश आहे. खडसंगी गावातील निम्मे डॉक्टर हे बोगस आहेत.ही माहिती आरोग्य विभागासह रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांना माहिती असतानासुध्दा कित्येक वर्षांपासून हे डॉक्टर दवाखाने थाटून रुग्णांवर धोकादायक औषधांचा सर्रास वापर करतात. यामुळे रुग्णांच्या कल्याणासाठी स्थापण्यात आलेली समिती बोगस डॉक्टराविषयी अनभिज्ञ असल्याचे भासवून अशा डॉक्टरांची पाठराखण करीत असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.

Web Title: Rug doctor bogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.