कायद्याचे राज्य निर्माण होऊन सर्वांना न्याय मिळणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:30 AM2021-08-26T04:30:04+5:302021-08-26T04:30:04+5:30
ब्रह्मपुरी : जागतिक कीर्तीचे बाबासाहेब, त्यांना ज्ञानाची भूक होती. जातिराष्ट्र विघातक आहे. जोपर्यंत जातींचा अंत नाही, तोपर्यंत देशाचा विकास ...
ब्रह्मपुरी : जागतिक कीर्तीचे बाबासाहेब, त्यांना ज्ञानाची भूक होती. जातिराष्ट्र विघातक आहे. जोपर्यंत जातींचा अंत नाही, तोपर्यंत देशाचा विकास नाही, असे ते म्हणत. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना एका मुशीत बांधले. संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्या लोकांनी सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून द्यावा. आज काही अंश लोकशाहीत पेरले गेले आहेत, पण ‘खाउजा’ने सामाजिक न्यायाचा खून केला. आज आरक्षण आहे; पण नोकऱ्या नाहीत. लोकांचे कल्याण हे सरकारचे उद्दिष्ट असावे. कौटिल्याने याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मूलभूत अधिकार घटनेने दिले. संविधान म्हणजे कायदा; म्हणून कायद्याचे राज्य निर्माण होऊन सर्वांना सामाजिक, आर्थिक न्याय मिळणे गरजेचे आहे, असे मार्मिक विवेचन सैनिक फेडरेशन म. रा.चे अध्यक्ष ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी केले.
ते गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीअंतर्गत नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रह्मपुरीच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रम आभासी पद्धतीने पार पडला. मुख्य संरक्षक कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. अध्यक्षपदी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, तर प्रमुख उपस्थितांत कुलसचिव (प्र.) डॉ. अनिल चिताडे, संस्था सचिव अशोक भैया उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक पैलूंवर डॉ. कावळे यांनी प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय आमंत्रक म्हणून प्राचार्य डाॅ. एन. एस. कोकोडेंनी केले. संचालन समन्वयक डॉ. युवराज मेश्राम, तर सर्वांचे आभार डॉ. धनराज खानोरकरांनी मानले. यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. एन. एस. कोकेडे, उपप्राचार्य डाॅ. डी. एच. गहाणे, विद्यापीठ समिती अध्यक्ष डॉ. रश्मी बंड, सहसमन्वयक डॉ. योगेश ठावरी, सदस्य प्रा. रूपेश वाकोडीकर, प्रा. अभिमन्यू पवार, डाॅ. प्रकाश वट्टी, प्रा. मिलिंद पठाडे, राजू मेश्राम, घनश्याम नागपुरे यांनी परिश्रम घेतले.
250821\img-20210825-wa0065.jpg
ब्रिगेडियर सुधीर सावंत मार्गदर्शन करताना