दिवाबत्ती कराचा शासन निर्णय मागे घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:18 AM2021-07-09T04:18:52+5:302021-07-09T04:18:52+5:30
ग्रामसंवाद सरपंच संघाचे निवेदन शंकरपूर : महाराष्ट्र शासनाने दिवाबत्ती वीज बिलाचा भरणा १५ व्या वित्त आयोगातून करण्याचा शासन निर्णय ...
ग्रामसंवाद सरपंच संघाचे निवेदन
शंकरपूर : महाराष्ट्र शासनाने दिवाबत्ती वीज बिलाचा भरणा १५ व्या वित्त आयोगातून करण्याचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. हा शासन निर्णय मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश वारजूकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसंवाद सरपंच संघातर्फे शासनाला देण्यात आले.
गाव पातळीचा विकास करण्यासाठी वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीला देण्यात येते. त्या निधीतून ग्रामपंचायत गावातील मूलभूत गरजा असलेले कामे करीत असतात. परंतु याच निधीतून दिवाबत्ती कर भरण्याचे पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झाल्यामुळे ग्रामपंचायत सरपंच संभ्रमात आले आहे. दिवाबत्ती कर आतापर्यंत जिल्हा परिषद भरत होते. ग्रामपंचायतचा विकास निधी जर दिवाबत्ती करामध्ये गेला तर गावाचा विकास कसा करावा, असा प्रश्न सरपंचांना पडलेला आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशा आशयाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी चिमूर पंचायत समितीचे उपसभापती रोशन ढोक, चिमूर तालुका ग्रामसंवाद सरपंच संघाचे अध्यक्ष वैभव ठाकरे, सरपंच शालिनी दोहतरे, शुभम मंडपे, सरपंच सिंगारे, दिडमुठे आदी उपस्थित होते.