रमजाननिमित्त बाजारपेठेत गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:43 PM2019-06-03T22:43:12+5:302019-06-03T22:43:32+5:30

मुस्लीम बांधवांचा पवित्र मानला जाणारा रमजान ईद हा सण दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. यंदा सुका मेव्यासह इतर साहित्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने खिशाला मोठी झळ बसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

The rumored market rises in the crowd | रमजाननिमित्त बाजारपेठेत गर्दी वाढली

रमजाननिमित्त बाजारपेठेत गर्दी वाढली

googlenewsNext
ठळक मुद्देसुकामेव्याच्या मागणीत वाढ : महागाईमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मुस्लीम बांधवांचा पवित्र मानला जाणारा रमजान ईद हा सण दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. यंदा सुका मेव्यासह इतर साहित्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने खिशाला मोठी झळ बसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रमजान महिना सुरू होताच बाजारपेठेत दुकाने महिनाभर विविध खाद्यपदार्थ, साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंनी फुलल्याचे दिसून येते. महिनाभर शीतपेय, सरबत, मिठाई आणि फळांच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी या दुकानावर दिसत आहे. या महिन्यातील तीन टप्प्यांपैकी एकेक टप्पा संपतांना ईदच्या खरेदीवर ग्राहकांचा जोर वाढला आहे. पहिल्या दहा दिवसात रोजा पाळणारे मुस्लीम बांधव केवळ इफ्तार आणि सहरीचे पदार्थ खरेदी करताना दिसतात तर दुसऱ्या दहा दिवसात ईदसाठी नवे कपडे खरेदीवर जोर दिसतो. आता या महिन्याच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर महिला शृंगार साहित्य, सजावटीचे साहित्य तर पुरुष टोपी, रुमाल, पादत्राणांच्या खरेदीवर जोर देत आहे. त्यातच आता ईद सण दोन दिवसांवर आला असताना या सणात महत्त्वाचा मानला जाणारा शिरखुर्मा हा पदार्थ तयार करण्यासाठी सुका मेव्याव्या खरेदीसाठी मुस्लीम बांधवाची दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे.
ग्राहकांच्या मागणीनुसार दुकानदारांनी बदाम, काजू, मनुका, पिस्ता, चारोळी, खोबरे, आदींसह विविध पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून दुकाने थाटली आहेत. तथापि यंदा या पदार्थाचे दर १० टक्क्यांनी वाढल्याने खिशाला झळ बसत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
रंगीत टोप्यांना पसंती
मुस्लीम बांधवांचे पवित्र रमजान पर्व अंतिम टप्प्यात पोहोचले असून ईदनिमित्तच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी उसळली आहे. त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे.. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध प्रकारचे कपडे, टोप्या, सूट, सौंदर्यप्रसाधने, अत्तरे, मुलांचे कपडे, बांगड्या, रंगीत शेवया, पठाणी ड्रेस, विविध खाद्य पदार्थ, खजूर आदींना मागणी वाढली आहे. काचेचे ग्लास, कटोरे यांचे विविध आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. ईदनिमित्त रंगीबेरंगी शेवयांनाही मागणी वाढली आहे.
मेंदी, बांगड्या, सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानात तसेच मुलांसाठी कपडे तसेच पादत्राणांच्या दुकानातही सकाळी तसेच सायंकाळच्या सुमारास मोठी गर्दी बघायला मिळत आहे.

Web Title: The rumored market rises in the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.