कापसाच्या धावत्या ट्रकला आग

By admin | Published: April 24, 2017 01:01 AM2017-04-24T01:01:33+5:302017-04-24T01:01:33+5:30

कापूसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक धावत असताना आग लागली. अग्निशामक दलाने प्रयत्न करुनही आग आटोक्यात आली नाही.

Running trash of cotton | कापसाच्या धावत्या ट्रकला आग

कापसाच्या धावत्या ट्रकला आग

Next

कापसासह ट्रक जळून खाक : पिंपळगाव येथील घटना
वरोरा : कापूसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक धावत असताना आग लागली. अग्निशामक दलाने प्रयत्न करुनही आग आटोक्यात आली नाही. आगीत ट्रकसह कापूस जळून भस्मसात झाला. ही घटना नागपूर - चंद्रपूर मार्गावरील पिंपळगाव शिवारात २२ एप्रिल रोजी रात्री घडली.
एमपी ३७ जीए०७२८ या क्रमांकाचा ट्रक राजुरा येथून मध्य प्रदेशातील सतलापूर मंडीदीप येथे कापसाच्या गाठी घेवून जात होता. हा ट्रक पुढे निघाल्यावर नागपूर- चंद्रपूर मार्गावरील येन्सा गावानजीक ट्रकमधील कापसाला आग लागली. ही आग वाढत असल्याचे लक्षात येताच चालकाने पेटता ट्रक पिंपळगाव शिवारात रस्त्याच्या कडेला उभा केला. चालक व वाहक खाली उतरून पोलिसांना माहिती देण्याकरिता निघाले.
ट्रक जवळत असल्याची माहिती मिळताच वरोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रकची आग विझविण्यासाठी जीएमआर एनर्जी कंपनीच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाऱ्यामुळे आग आटोक्यात आली नाही. परिणामी कापसासह ट्रक जळून खाक झाला. (तालुका प्रतिनिधी)

नागपूर-चंद्रपूर मार्गावरील वाहतूक प्रभावित
कापसाचा ट्रकने पेट घेतल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभा होता. त्या बाजूने वाहतूक सुरु होती. त्यामुळे तेथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने चंद्रपूरवरुन नागपूरकडे जाणारी वाहतूक येन्सा गावाजवळ पोलिसांनी थांबविली. तसेच चंद्रपूरकडे जाणारी वाहतूक टेमुर्डा गावानजीक रोखण्यात आली. आगीच्या ज्वाळा कमी झाल्यानंतर एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली. तोपर्यंत काही काळ वाहतूक प्रभावित झाली होती.

Web Title: Running trash of cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.