गवराळा क्षेत्र’ देऊ शकतो पर्यटनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:55 AM2019-09-01T00:55:14+5:302019-09-01T00:55:45+5:30

भद्रावती शहर यापूर्वीच ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले. शासनाकडून निधी मिळतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहे. येथील तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांची संख्या मोठी आहे. गवराळा येथील वरद विनायक मंदिर तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

Rural areas can provide tourism | गवराळा क्षेत्र’ देऊ शकतो पर्यटनाला चालना

गवराळा क्षेत्र’ देऊ शकतो पर्यटनाला चालना

Next
ठळक मुद्देराज्य सरकारने द्यावा ५ कोटींचा निधी, नगर परिषदेकडून पाठपुरावा सुरू

सचिन सरपटवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : शहरातील ऐतिहासिक गवराळा पर्यटन क्षेत्राचा विकास केल्यास विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा सुरळीत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका वठवू शकतो.
भद्रावती शहर यापूर्वीच ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले. शासनाकडून निधी मिळतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहे. येथील तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांची संख्या मोठी आहे. गवराळा येथील वरद विनायक मंदिर तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. निसर्गाचे वरदान, रमणीय परिसर, आजुबाजुला टेकड्या, सभोवताली आमराई, बाजुलाच १० एकर परिसर असलेला गवराळा तलाव असे सौंदर्य या मंदिराला लाभले आहे. नगरपरिषदद्वारे हा खासगी तलाव विकत घेवून सौंदर्यीकरणाच प्रयत्न सुरू आहे.
सदर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. सदर तलाव न.प. ने विकत घेतल्यास तसेच यासाठी शासनाकडून ५ कोटींचा निधी उपलब्ध झाल्यास चांगले पर्यटन स्थळ अस्तित्वात येवू शकते. तलावात बोटींग, तलाव खोलीकरण, सभोवताल दिवे, तलावाभोवती फिरण्यासाठी मार्ग तयार करण्याचा न. प. चा मानस आहे. यातून परिसराचा चेहरामोहरा बदलू शकतो. एका उत्तरभिमुख असलेल्या या मंदिरात ६ फुट उंचीची गणेशाची मुर्ती आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक हे मंदिर आहे.

भद्रावती शहरात पर्यटनाची मांदियाळी
भद्रावती परिसरात बरीच पर्यटनस्थळे आहेत. देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा काही भाग तालुक्यात येतो. भद्रावती ते ताडोबा सरळ मार्ग झाल्यास भद्रावती येथे पर्यटकांची वर्दळ वाढू शकते. जगप्रसिद्ध विजासण लेणी, जैन मंदिर, गोंडराजाचा किल्ला, नाग मंदिर, भवानीमाता मंदिर, पुरातन डोलारा तलाव पर्यटकांचे आकर्षणस्थळ आहे. चांदा ते बांदा योजनेतंर्गत सुधारणा केल्यास तिर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपाला येऊ शकते.

गृत्स्यमदाची तपश्चर्या
एका उत्तरभिमुख असलेल्या गवराळा येथील मंदिरात सहा फुट उंचीची गणेशाची मुर्ती आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक. गृत्स्यमदाने ज्या पुष्पक वनात तपश्चर्या केली. तेथे वर प्राप्त झाले, अशी आख्यायिका आहे. त्यानंतर वरदविनायकाची स्थापना झाली. समोर उत्तरमुखी हनुमान मंदिर व बाजुलाच मोठे स्वयंपाकगृह आहे. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

Web Title: Rural areas can provide tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन