ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 10:08 PM2019-03-09T22:08:47+5:302019-03-09T22:09:31+5:30

मूल तालुक्यातील मारोडा, राजोली, बेंबाळ आणि चिरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी ९० टक्के कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु यापैकी बहुतांश डॉक्टर आणि कर्मचारी मुख्यालयाला ‘खो’ देत असल्याने आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजत आहे.

Rural health services collapse | ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली

Next
ठळक मुद्देडॉक्टरांची कमतरता : रात्रपाळीत कर्मचारी राहात नसल्याने नागरिकांची बोंब, वरिष्ठांनी लक्ष द्यावे

भोजराज गोवर्धन।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : मूल तालुक्यातील मारोडा, राजोली, बेंबाळ आणि चिरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी ९० टक्के कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु यापैकी बहुतांश डॉक्टर आणि कर्मचारी मुख्यालयाला ‘खो’ देत असल्याने आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजत आहे.
तालुक्यातील चिरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील अनेक दिवसांपासून नियमित वैद्यकीय अधिकारी नाही. यामुळे रूग्णांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन उपचार करावा लागत आहे. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची बोंब नागरिकांमध्ये सुरू आहे. तालुक्यातील चिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. अनिल रायपुरे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. ३१ जानेवारी रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडील कार्यभार बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी डॉ. बिना आयलनवार यांच्याकडे सोपविण्यात आला. डॉ. बिना आयलनवार यांचा बंधपत्र २८ फेब्रुवारी रोजी संपल्यामुळे गडीसुर्ला येथील उपकेंद्रातील याठिकाणी डॉक्टर नसल्यामुळे रात्रपाळीत येणाऱ्या रूग्णांना मोठया अडचणीचा सामना करावा लागत आहे, कधीकाळी बोगस डॉक्टरांकडूनही उपचार करून घ्यावा लागत आहे. अशीच स्थिती राजोली येथील आहे, एका डॉक्टरांच्या भरोश्यावर १४ गावांची धुरा असून ही धुरा डॉ. सुमेध खोब्रागडे यांना सांभाळावी लागत आहे.
राजोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमेध खोब्रागडे यांच्याकडे राजोली व्यतिरिक्त मारोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा पदभार आहे. यामुळे डॉ. खोब्रागडे यांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे ९० टक्के पदे प्राथमिक भरण्यात आली आहेत. मात्र डॉक्टरांची पदे मोठ्या प्रमाणावर अद्यापही रिक्त आहेत.
पदे न भरल्यास आंदोलन
चिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कारभार वाºयावर सुरू आहे, याठिकाणी औषधसाठा नाही. आरोग्य कर्मचारी आलेल्या रूग्णांशी सौजन्याने बोलत नाही. मागील अनेक दिवसांपासून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाही. यामुळे रूग्णांना इतरत्र जावून उपचार करावा लागत आहे. येत्या काही दिवसात नियमित डॉक्टरांची पदे न भरल्यास चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आंदोलन करून अशी प्रतिक्रिया चिरोली ग्रामपंचायतच्या उपसरपंच तथा रूग्ण कल्याण समितीच्या सदस्य कविता सुरमवार यांनी दिली.
दोन कर्मचारी निलंबित
रूग्णांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक आरोग्य सेविका आणि एक आरोग्य सहाय्यकांना २८ फेब्रुवारी रोजी आरोग्य अधिकाऱ्यांनी निलंबित केले होते, हे विशेष.
कायमस्वरूपी डॉक्टरांची पदे भरावी
चिरोली व परिसरातील नागरिक मोठया संख्येने चिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात. मात्र त्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळत नाही. यामुळे चिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टरांची पदे भरण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याबाबत आपण आग्रही असल्याची प्रतिक्रिया चिरोली येथील रूग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज अवताडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

डॉक्टर आणि कर्मचाºयांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. डॉक्टर व कर्मचारी मुख्यालयी राहत आहेत की नाही, याबाबत चैकशी करून मुख्यालयी राहण्याचे आदेश देवू.
- डॉ. सुधीर मेश्राम,
तालुका वैद्यकीय अधिकारी, मूल.

Web Title: Rural health services collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.