पोंभुर्ण्यात लवकरच सुरू होणार ग्रामीण रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:18+5:302021-06-04T04:22:18+5:30
घोसरी : पोंभुर्णा येथील नवीन ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभी असून ३० खाटांसह वैद्यकीय अधीक्षक गट (अ) यांना ...
घोसरी : पोंभुर्णा येथील नवीन ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभी असून ३० खाटांसह वैद्यकीय अधीक्षक गट (अ) यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून शासन निर्णय बुधवारी निर्गमित केले. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात लवकरच होणार आहे.
मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकरी यांची विसी झूमद्वारे बैठक घेतली होती. त्यात कोरोना व आरोग्य विषय समस्यांबाबत विचारणा केली होती. त्यामुळे पोंभुर्णा येथील शिवसेना पदाधिकारी आशिष कावटवार यांनी ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून तेथे लवकरात लवकर पद निर्मिती करून सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. त्या मागणीची दखल घेऊन भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचे आश्वस्त केले आहे.