ग्रामीण रस्ते डांबरीकरणाविना

By admin | Published: October 28, 2016 12:41 AM2016-10-28T00:41:06+5:302016-10-28T00:41:06+5:30

जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते.

Rural roads without tarpaulin | ग्रामीण रस्ते डांबरीकरणाविना

ग्रामीण रस्ते डांबरीकरणाविना

Next

प्रशासनाची उदासीनता : दुरुस्तीची कामे होत नसल्याने जातोय अनेकांचा बळी
चंद्रपूर : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते. मात्र स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे जिल्हा वार्षिक अहवालातून समोर आले आहे. या वर्षीच्या पावसाने तर शहरती तसेच ग्रामीण रस्त्यांची वाट लागली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरूस्तीचे काम केली जात नसल्याने अपघात घडून अनेकांना जीव गमवावा लागत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार ग्रामीण रस्त्यांची एकुण लांबी ४ हजार ९४९.९० किलोमीटर आहे. यापैकी तब्बल २ हजार १०९.१६ किलोमीटरचे ग्रामीण रस्ते खडीकरणाचे आहेत. मातीच्या रस्त्यांची लांबी ३०१.१६ किलोमीटर असून डांबरीकरण झालेल्या रस्त्यांची एकुण लांबी २ हजार ५३९.५८ किलोमीटर एवढी दर्शविण्यात आली आहे.
ग्रामीण भागाचा विकास हा त्या भागातील रस्त्यांच्या स्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे दळणवळणासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे आहे. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे आजही अनेक गावातील रस्त्यांची स्थिती सुधारली नसून वाट खडतरच आहे. त्यामुळे या रस्त्यांवर अनेक अपघात घडून नागरिकांचा बळी जात आहे.
विशेष म्हणजे पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम करण्याची शासनाची योजना आहे. ग्रामीण रस्ते तालुका व जिल्हा मार्गाला जोडणे अपेक्षीत आहे. यासाठी जिल्ह्याला करोडो रूपयाचा निधी दरवर्षी दिला जातो. मात्र प्रशासनातील उदासीनतेमुळे ग्रामीण भागातील रस्ते जैसे थे असून, ज्या रस्त्यांची दुरूस्ती आवश्यक नाही, अशा रस्त्यांवर निधी खर्च केला जात, असे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे शहरी भागातील अनेक रस्त्यांची वर्षातून दोनदा दुरूस्ती होते, तर ग्रामीण भागातील रस्त्यांकडे लक्षच दिले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.
जिल्ह्यात जिल्हा मार्ग म्हणून डांबरीकरण झालेले १ हजार २००.०५ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. तर ग्रामीण मार्ग म्हणून १ हजार ३३९.५३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. तसेच तब्बल १ हजार ६४९.७६ किलोमीटर लांबीचे खडीकरणाचे रस्ते अद्यापही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Rural roads without tarpaulin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.