जीव धोक्यात घालून शववाहिका चालकांचा सेवेचा यज्ञ अविरत सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:30 AM2021-04-28T04:30:30+5:302021-04-28T04:30:30+5:30
कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व जण हैराण झाले आहेत. या काळात कोरोना योद्धे म्हणून अनेक जण मदतीसाठी पुढे आले असून त्यात ...
कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व जण हैराण झाले आहेत. या काळात कोरोना योद्धे म्हणून अनेक जण मदतीसाठी पुढे आले असून त्यात शववाहिका चालकांची भूमिका महत्त्वाची आहे. मनपाच्या दोन शववाहिका आहेत. या शववाहिकांमध्ये २२ कर्मचारी कार्यरत आहेत. कोविड रुग्णालयात मृत झालेल्या रुग्णांना घेऊन हे चालक शांतीधामपर्यंत नेत असतात. तेथे नेमलेले कर्मचारी त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत असतात. मनपातर्फे या चालक व वाहकांना मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट पुरविण्यात आले आहे. स्वत:च्या जीवाची काळजी घेत हे योद्धे मृतदेह शांतीधामपर्यंत नेण्याचे काम करीत असतात.
कोट
मनपातर्फे ३ शववाहिका उपलब्ध केल्या आहेत. २२ जणांची चमू तयार केली असून रुग्णालयातून अंत्यसंस्कार करेपर्यंत ही चमू काम करीत असते. सर्वांचे काम विभागून देण्यात आले आहे. त्या सर्वांना पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर अशा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
- राजेश मोहिते, मनपा आयुक्त, चंद्रपूर
--------
शववाहिकेतील कर्मचारी तसेच शांतीधाममधील कर्मचाऱ्यांना काळजीपूर्वक अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच त्यांना पीपीई किट, मास्क, हॅन्डग्लोव्हज सॅनिटायझर अशा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
राखी कंचर्लावार, महापौर मनपा