साधनाताई आमटे यांच्या स्मृतीदिनी वृक्षदिंडी व वृक्षारोपण

By admin | Published: July 10, 2015 01:26 AM2015-07-10T01:26:25+5:302015-07-10T01:26:25+5:30

ताई व बाबांना स्वत:चा फोटो कार्यक्रमात व आनंदवनात लावलेला आवडत नव्हता. ताईंना पुरस्काराचा मोह नव्हता.

Sadhnatai Amte's Smriti Dini Tree and Tree Plantation | साधनाताई आमटे यांच्या स्मृतीदिनी वृक्षदिंडी व वृक्षारोपण

साधनाताई आमटे यांच्या स्मृतीदिनी वृक्षदिंडी व वृक्षारोपण

Next

आनंदवनात कार्यक्रम : अनेक मान्यवरांनी अर्पण केली आदरांजली
वरोरा : ताई व बाबांना स्वत:चा फोटो कार्यक्रमात व आनंदवनात लावलेला आवडत नव्हता. ताईंना पुरस्काराचा मोह नव्हता. सुगंध असेल तर तो आपोआप जगभर जाईल, अशा साधनाताई नेहमी म्हणत असत. एक ना अनेक ताईंच्या आठवणींनी सांगताना गुरूवारी आनंदवनात ताईच्या स्मृतिदिनानिमित्य महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी साधनाताईंचा कार्याला उजाळा दिला. साधनाताई आमटे यांच्या चवथ्या स्मृतिदिनी आनंदवनात वृक्षदिंडी व वृक्षारोपण करण्यात आले.
ताईचा स्मृतीदिन वृक्षसंवर्धन व पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहनही डॉ. विकास आमटे यांनी यावेळी केले. आज सकाळी आनंदवनातील अनाम वृक्षांच्या स्मरण शिळेला पुष्पगुच्छ अर्पण करून वृक्षदिंडीला सुरुवात करण्यात आली. वृक्षदिंडी आनंदवनात फिरल्यानंतर परत येताना आनंद विहारमध्ये डॉ. विकास आमटे व डॉ. भारती आमटे यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. वृक्षदिंडी श्रद्धावनात आल्यानंतर ताईंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ. भारती आमटे यांनी गित गायल्यानंतर आनंदवन निर्मीत स्वरानंदन आॅर्केस्ट्राच्या कलाकारांनी बाबांचे गित ‘माणूस माझे नाव’ व ‘आज येई अंगणा, पाहुणा गोजीरा’ हे वृक्ष गित सादर केले. वृक्ष दिंडीमध्ये आनंद मूकबधीर महाविद्यालय, आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन कृषी तंत्र निकेतन तसेच आनंदवनातील अंध अपंग, कुष्ठरोगी, वृद्ध आदी दोन हजारापेक्षाही अधिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाला महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ, सदाशिव ताजने, डॉ. शितल आमटे, कविश्वर, वनामती प्रशिक्षण संस्थेची चमु प्राचार्य डॉ. मृणाल काळे, प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, चित्रपट निर्माते शेखर नाईक, प्राचार्या हर्षदा पोतदार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रवींद्र तलगंटीवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
५ मे २०१६ पर्यंत ‘समिधा’ चित्रपट पूर्ण होणार
साधनाताईंवर लिहिलेले ‘समिधा’ पुस्तक वाचून ताईंचे जीवन समजावून घेतले. त्यांच्या जीवनातील साधेपणाही यातून कळला. हा साधेपणा रेखाटने तितकेच कठीण आहे. तरीपण सर्व अडचणीवर मात करून ताईंवरील ‘समिधा’ चित्रपट ५ मे २०१६ पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास चित्रपट निर्माते शेखर नाईक यांनी व्यक्त केला.
आनंद कृषी निकेतन महाविद्यालयात वृक्षारोपण
महारोगी सेवा समिती आनंदवनद्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात साधनाताईच्या स्मृती दिनानिमित्त वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. रहाटे, प्रा. पुसदेकर, प्रा. बघेल, प्रा. थुल, प्रा. पातोडे आदी उपस्थित होते.

Web Title: Sadhnatai Amte's Smriti Dini Tree and Tree Plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.