कोविड केअरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:27 AM2021-05-15T04:27:11+5:302021-05-15T04:27:11+5:30
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या तसेच घरी गृहविलगीकरणात राहण्याची सोय नसणाऱ्यांना रुग्णांना कोविड केअर ...
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या तसेच घरी गृहविलगीकरणात राहण्याची सोय नसणाऱ्यांना रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येते. चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक तालुका स्तरावर कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. कोविड सेंटर आणि रुग्णालयात सेवा बजावताना आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. त्यामुळे येथे कंत्राटी कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात आले आहेत.
परंतु, कोविड सेंटर काम करणाऱ्या इतर शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने विमा कवच दिले आहे. परंतु, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे विमा कवच देण्यात आले नसल्याने सेवा बजावताना काही बरेवाईट झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कोणताच लाभ मिळणार नसल्याची स्थिती आहे. परिणामी या कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना विमा देण्यात यावा, अशी मागणी आहे.