कोरोनाग्रस्तांना साई वर्धा कंपनीचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:21 AM2021-05-28T04:21:20+5:302021-05-28T04:21:20+5:30
फोटो : कंपनीच्या वतीने लसीकरण केंद्रात केली जात असलेली मदत वरोरा : कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले तर काहींना ...
फोटो : कंपनीच्या वतीने लसीकरण केंद्रात केली जात असलेली मदत
वरोरा : कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले तर काहींना दोन वेळेचे अन्न कसे मिळेल याची विवंचना लागली असताना वरोरा येथील औद्योगिक वसाहतीतील साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनीच्या वतीने कोविडग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.
वरोरा शहरातील माता महाकाली कोविड केंद्रात कंपनीच्या वतीने चारशे रुग्णांना दररोज चहा-नाश्ता आणि भोजन पुरविले जाते. आरोग्य कर्मचाऱ्यांकरिता कंपनीच्या वतीने ५०० फेस शिल्ड आणि मास्कचे वाटप करण्यात आले. शहरातील लसीकरण केंद्र करिता कंपनीच्या वतीने आठ संगणक आणि एक कर्मचारी देण्यात आला आहे. कंपनी परिसरातील आठ ग्रामपंचायती आणि वरोडा नगरपरिषद क्षेत्रातील लोकांना मास्क, सॅनिटायझर आणि सोडियम हायड्रॉक्साइडचे वितरण करण्यात आले. शहरातील विलगीकरण कक्षात असलेल्या १०० व्यक्तींना दररोज नाश्ता पुरविला जात आहे. तालुक्यातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कंपनीतर्फे करण्यात आला असून अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रमास गहू, तांदूळ, तूर डाळ, साखर आणि तेलाचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे कंपनीच्या सीएसआर विभागांतर्गत कंपनीचे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण भागात जाऊन कोविड रुग्णांना सेवा देत आहेत. कंपनीने घेतलेल्या या पुढाकाराचे स्वागत होत असून यापुढेही गरजूंना मदत करण्याचे आश्वासन कंपनीचे अधिकारी ज्ञानेश माटे यांनी सांगितले. मुख्य प्रबंधक दिलीप जोशी यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ व्यवस्थापक मुकेश ओवे आणि त्यांची चमू या करता परिश्रम घेत आहे.
===Photopath===
270521\img-20210523-wa0088.jpg
===Caption===
news from warora