चिमूर जिल्हा निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:28 AM2021-03-05T04:28:00+5:302021-03-05T04:28:00+5:30
चिमूरची भूमी ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतील असून, चिमूर क्रांती लढ्याची ज्योत ही सन १९७०च्या दरम्यानपासून विविध राजकीय ...
चिमूरची भूमी ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतील असून, चिमूर क्रांती लढ्याची ज्योत ही सन १९७०च्या दरम्यानपासून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून तेवत आहे. चिमूर हे ठिकाण चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यापासून १०० किमी अंतरावर आहे. चिमूर ही परगण्याची राजधानी, तर इंग्रजी राजवटीत १८५२ ते १८७३ पर्यत जिल्हा असल्याची नोंद आहे. तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले व भोसले यांच्या काळात चंद्रपूर जिल्हा विभाजन करताना चिमूर क्रांती चळवळ व लोकसभा असल्याने प्राधान्य दिले होते. परंतु आदिवासी व गैर आदिवासी कारण पुढे करीत सन १९८२ ला गडचिरोलीला जिल्हा करण्यात आले.
चिमूर क्रांती जिल्हा घोषित झाल्यास औद्योगिक चालना मिळून बेरोजगारी दूर होईल. चिमूर येथे विविध शासकीय कार्यालये असून, राजकीय पक्ष, संघटना संघर्ष करीत असून, शिवसेनाही जिल्हा मागणीसाठी कटिबद्ध असल्याने
चिमूर क्रांती जिल्हा घोषित करण्याची मागणी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख धर्मसिह वर्मा यांनी मुख्यमंत्री ठाकरे व नगरविकास बांधकाम मंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.