ताडोबातील वन्यजीवांसाठी साकारतोय अंडरपास मार्ग, ४० कोटींतून बनतोय कॉरिडोर पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 06:12 PM2021-10-11T18:12:27+5:302021-10-11T18:14:22+5:30

चिमूर-वरोरारोडवरील चिमूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कॉरिडॉरवर वन्यजीवांसाठी ४० कोटी रुपयांचा १२०० मीटर लांबीचा अंडरपास (भूमिगत मार्ग) साकारत आहे.

Sakartoy underpass route for wildlife in Tadoba | ताडोबातील वन्यजीवांसाठी साकारतोय अंडरपास मार्ग, ४० कोटींतून बनतोय कॉरिडोर पूल

ताडोबातील वन्यजीवांसाठी साकारतोय अंडरपास मार्ग, ४० कोटींतून बनतोय कॉरिडोर पूल

googlenewsNext
ठळक मुद्देचिमूर-वरोरा मार्गावर बनतोय कॉरिडॉर

राजकुमार चुनारकर

चिमूर : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पमधील वाघांची व इतर प्राण्यांची संख्या वाढल्याने वन्यजीवांना नवीन जंगलात स्थलांतर करताना वाहतुकीचा अडथळा होऊ नये म्हणून चिमूर-वरोरारोडवरील चिमूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कॉरिडॉरवर वन्यजीवांसाठी ४० कोटी रुपयांचा १२०० मीटर लांबीचा अंडरपास (भूमिगत मार्ग) साकारत आहे. बॅंका कन्ट्रक्शन कंपनीकडून अंडरपासचे युद्धस्तरावर काम सुरू आहे.

दिवसागणिक ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील जंगल वाघांच्या अधिवासासाठी क्षेत्र कमी पडू लागले आहे. वाघासह वन्यजीव क्षेत्र बदलत असतात, ताडोबातील वाघ उमरेड तालुक्यातील कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्प भ्रमंती करतात. यासाठी ताडोबा लागत असलेल्या चिमूर तालुक्यातील शेंडेगाव ते बंदर गावाच्या मधील भागाला वाघांचे कॉरिडॉर म्हणून ओळखले जाते.

चिमूर ते वरोरा हा राष्ट्रीय महामार्ग बनल्यामुळे या रोडचे काम सुरू आहे. हा मार्ग राष्ट्रीय बनल्यामुळे वाहनांची ये-जा करण्याची संख्या वाढली आहे. या वाहनांमुळे वन्यप्राण्याच्या जीवितास धोका होऊ नये व आवागमनासाठी त्रास होऊ नये म्हणून शासनाने या मार्गावर वन्यप्राण्यासाठी १२०० मीटर लांबीचा अंडरपास मार्गाला मंजुरी देत काम सुरू केले आहे.

अपघाताचा धोका टळणार

या अंडरपास मार्गामुळे वन्यप्राण्यांना कर्कश हॉर्न, ध्वनी प्रदूषण यापासून मुक्ती मिळणार आहे. अपघाताचा धोकाही टळणार असून, या अंडरपास मार्गामुळे ताडोबातील वाघासह वन्यप्राण्यांना हक्काचा कॉरिडॉर मिळणार आहे.

असा असेल अंडरपास कॉरिडॉर मार्ग

बाराशे मीटरच्या या अंडरपास मार्गात ७५० मीटरचा पूल तर ४५० मीटरचा उतार मार्ग असणार आहे. या पुलावर ६७ कॉलम व २६ स्पॉंन (स्लॅब) आहेत. रोडचे रुंदी १६ मीटर असून ११ मीटरचा कारेंज वे तर अडीच मीटरचा दोन्ही बाजूने फुटपाथ राहणार आहे.

Web Title: Sakartoy underpass route for wildlife in Tadoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.