सखींनी १५० झाडे घेतली दत्तक
By admin | Published: July 10, 2016 12:41 AM2016-07-10T00:41:41+5:302016-07-10T00:41:41+5:30
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दोन कोटी वृक्ष लागवड करण्याच्या आवाहनाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला....
पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद : वृक्ष लागवड करुन संगोपनाची घेतली जबाबदारी
कोठारी: चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दोन कोटी वृक्ष लागवड करण्याच्या आवाहनाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. कोठारी येथील लोकमत सखींनी १५० झाडांची लागवड करुन त्यांच्या संगोपनाची व संरक्षणाची जबाबदारी स्वीकारुन नवीन आदर्श निर्माण केला.
कोठारी वनपरिक्षेत्रात १५ हजार झाडांची लागवड करण्यात आली. सर्व झाडांना लोकसहभागाने रोपण करण्यात आले. त्यात कोठारी लोकमत सखी मंचाच्या सदस्यांनी भरभरुन सहभाग घेतला. गाव तलावाच्या खुल्या जागेवर सखींनी शेकडो झाडांची लावगड करुन दीडशे झाडांना दत्तक घेत त्यांचे संगोपन व संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली.
जनावारांपासून झाडाचे संरक्षण करण्याकरिता ट्री-गार्ड लावण्यात आले. सदर झाडांना खत, पाणी व रक्षण करुन कुटंबातील सदस्यांप्रमाणे त्याची सर्व जबाबदारी स्वीकारुन गावात नवीन आदर्श जनतेसाठी प्रेरणादायी ठरला आहे. या उपक्रमाची दखल मध्य चांदाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, कोठारीचे वनाधिकारी बी. जी. हाके, सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी घेत सखींना योग्य मार्गदर्शन करुन त्यांच्या कार्याचे जनतेंनेदेखील प्रत्येकी एक झाड जगविण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला शोभा वडघणे, पुष्पा मोरे, रसिका रंगारी, काजल टिंबडिया, भारती बोनगीरवार, रोशनी कांबळे, जयश्री नन्नावरे, कल्पना लोहे, स्नेहल टिंबडिया, लता कोरेकर, मनिषा बुटले, गीता साखरे, शोभा खोब्रागडे, वसुधा कुडे आदी सखींनी प्रोत्साहित केले. वक्ष लागवडचे दिवशी लोकमत सखी मंचाच्या वतीने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वृक्ष पीडित हिरव्या गणवेशात सहभागी झालेल्या सखी आकर्षणाचा विषय होता. हिरवा वेशभूषा करुन समस्त गाव हिरवे पर्यावरण समृद्ध करण्याचा संदेश सखींनी दिला. (वार्ताहर)