राजुऱ्याच्या रानवेली शिवारात कवडीमोल भावात शेतीची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:26 AM2021-05-15T04:26:34+5:302021-05-15T04:26:34+5:30
राजुरा : तालुक्यातील रानवेली शिवारात सीलिंगच्या मिळालेल्या एका शेतीची कवडीमोल भावात विक्री करण्यात आल्याची चर्चा आहे. ही शेतजमीन वर्ग ...
राजुरा : तालुक्यातील रानवेली शिवारात सीलिंगच्या मिळालेल्या एका शेतीची कवडीमोल भावात विक्री करण्यात आल्याची चर्चा आहे. ही शेतजमीन वर्ग २ मध्ये असल्याचे कळते. मुळात ज्या शेतकऱ्याला वाटपात जमीन मिळाली, त्याच्याकडे वडिलोपार्जित शेती होती. त्यामुळे त्याने कवडीमोल भावात शेती विकल्याची चर्चा आहे. या शेतीच्या विक्रीमध्ये एका व्यक्तीने चांगलीच दलाली घेतल्याची चर्चा आहे.
रानवेली शिवारात एका शेतकऱ्याला सीलिंगची शेती उदरनिर्वाहासाठी मिळाल्याची चर्चा आहे. ही शेती वर्ग २मध्ये असून, ती रस्त्यालगत आहे, अशी माहिती आहे. या शेतीसोबतच त्या शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित शेतजमीन असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उदरनिर्वाहसाठी मिळालेली वर्ग २ची शेती विकताना परवानगी घ्यावी लागते. मात्र, एका व्यक्तीने मोठी दलाली बळकावून शेतीचे इसारपत्र केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत संबंधित विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.