पावडर मिश्रित ताडीची तालुक्यात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:50 AM2021-02-18T04:50:29+5:302021-02-18T04:50:29+5:30
ताडाच्या झाडाखाली झोपडी टाकून ताड़ी विक्रीची अनेक दुकाने सध्या सावली तालुक्यामध्ये थाटल्याचे चित्र दिसत आहे. मात्र झाडावरील ताजी ताडी ...
ताडाच्या झाडाखाली झोपडी टाकून ताड़ी विक्रीची अनेक दुकाने सध्या सावली तालुक्यामध्ये थाटल्याचे चित्र दिसत आहे. मात्र झाडावरील ताजी ताडी आहे, असे सांगून चक्क पावडर मिश्रित ताडी विक्री करीत आहेत. ती कशी बनवितात याची चित्रफित सध्या सर्वत्र पसरल्याने खळबळ माजली आहे. ही फित सावली तालुक्यातीलच असल्याचे बोलले जात आहे. यात एक ताडी विक्रेता पावडरच्या माध्यमातून व इतर साहित्याचे मिश्रण करून ताडी बनवित असल्याचे दिसते. अशा प्रकारामुळे अनेक ताडी प्रेमींचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.
पावडर मिश्रित ताडी विकण्याचा गोरखधंदा तालुक्यात सुरू असताना प्रशासन मात्र डोळेझाक करीत असल्याचा आरोप प्रशासनावर केला जात आहे.