रेल्वे प्रशासनाच्या लाेखंडाची भंगार दुकानात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:33 AM2021-09-09T04:33:43+5:302021-09-09T04:33:43+5:30
एमएच ३४ एडी ५४३४ या क्रमांकाचे टाटा आयशर वाहन रेल्वेच्या वरोरा विभागाच्या सेवेत कार्यरत आहे. वाहनावर मध्य रेल्वे असे ...
एमएच ३४ एडी ५४३४ या क्रमांकाचे टाटा आयशर वाहन रेल्वेच्या वरोरा विभागाच्या सेवेत कार्यरत आहे. वाहनावर मध्य रेल्वे असे स्पष्टपणे लिहून आहे. हे वाहन रेल्वेचे लोखंड घेऊन वरोरा शहरातील गजबजलेल्या भागात असलेल्या भंगार दुकानात नेहमी येत असते. या वाहनातून रेल्वे प्रशासनाच्या लोखंडाची विक्री केली जाते. हा प्रकार मागील कित्येक दिवसांपासून सुरू आहे. रेल्वेच्या संपत्तीची चोरी होऊ नये, म्हणून सुरक्षा यंत्रणेवर लाखो रुपयांचा खर्च केले जातो, परंतु दिवसाढवळ्या मध्य रेल्वेच्या सेवेत असलेल्या वाहनाने लोखंड चोरी करून, भंगार दुकानात विकले जात आहे. याबाबत रेल्वे प्रशासनास माहिती नसणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कुंपणच जर शेत खात असेल, तर यावर आळा कोणी घालावा, असा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. यावर रेल्वे प्रशासनाने आळा घालणे गरजेचे झाले आहे.
080921\img_20210908_101422.jpg
warora