पावसाळी साहित्याची विक्री थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:51 AM2019-07-27T00:51:37+5:302019-07-27T00:56:00+5:30

यावर्षी प्रथम उशिरा आलेल्या आणि त्यानंतर हुलकावणी दिलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. असे असतानाच छत्र्या, रेनकोट व अन्य पावसाळी साहित्याची विक्री मंदावल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल बंद झाली आहे. परिणामी छोटे-मोठे व्यापारी चिंतेत असून पावसाने आणखी उघाड दिल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

The sale of rainy material cools down | पावसाळी साहित्याची विक्री थंडावली

पावसाळी साहित्याची विक्री थंडावली

googlenewsNext
ठळक मुद्देपावसाची हुलकावणी : ग्राहक नसल्याने व्यावसायिकांमध्ये चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यावर्षी प्रथम उशिरा आलेल्या आणि त्यानंतर हुलकावणी दिलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. असे असतानाच छत्र्या, रेनकोट व अन्य पावसाळी साहित्याची विक्री मंदावल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल बंद झाली आहे. परिणामी छोटे-मोठे व्यापारी चिंतेत असून पावसाने आणखी उघाड दिल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी साहित्याची दुकाने सजतात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार व्यापाऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाळी साहित्याची खरेदी करून दुकाने सजविली. मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे छत्र्या, रेनकोट, प्लॉस्टिक, ताडपत्री, टोप्या अशा वस्तू धुळखात पडल्या आहेत. साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात या साहित्याच्या विक्रीला सुरूवात होते. जूनच्या शेवटी शाळा, महाविद्याले सुरू होत असल्याने बहुतांश विद्यार्थी छत्र्या, रेनकोट खरेदी करतात. यासाठी येथील व्यापारी मुंबई, कोलकत्ता तसेच मोठ्या बाजारपेठेतून पावसाळी साहित्य बोलावतात. यावर्षीही साहित्य मोठ्या प्रमाणात बोलावण्यात आले आहे.
या पावसाळी साहित्यामध्ये छत्री विक्रीतून मोठी उलाढाल होते. फोल्डींगच्या चौकोनी, गोल, कॅपशेप, डायमंड, कारटून छत्री दोनशे ते अडिचशे रुपयांपासून उपलब्ध आहेत. प्लॉस्टिक व नायलॉन कापडाच्या या छत्र्यांपैकी भारतीय बनावटीच्या छत्र्या या चिनी छत्र्यांपेक्षा अधिक टिकावू असल्याचे विक्रेते सांगतात. रेनकोटचा प्रकार महागडा असला तरी यावेळी त्यातही माफक किंमतीचे रेनकोट उपलब्ध आहेत. लॅपटॉप तसेच स्कूल बॅक सामावून घेणारे रेनकोट, विद्यार्थ्यांमध्ये तसेच वनपीस रेनकोटची महिलांना अधिक पसंती आहे. या वस्तूंच्या किंमतीत यावर्षी १० ते १५ टक्क््यांनी वाढ झाली आहे. यावर्षी ग्राहकच नसल्याने व्यापाºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाने अशीच हुलकावणी दिल्यास मोठे नुकसान होणार असल्याचेही व्यापाºयांचे म्हणेणे आहे.

Web Title: The sale of rainy material cools down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस