तीन दिवसांत ४२ लाखांच्या वस्तूंची विक्री
By Admin | Published: March 6, 2017 12:25 AM2017-03-06T00:25:00+5:302017-03-06T00:25:00+5:30
विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर व ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर व गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ...
चंद्रपूरकरांची अलोट गर्दी : आज महोत्सवाचा अखेरचा दिवस
चंद्रपूर : विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर व ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर व गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांपासून स्थानिक चांदा कल्ब ग्राऊंडवर महिला स्वयंसहाय्यता बचत गटासाठी सरस महोत्सव स्वंयसिध्दा - २०१७ चे आयोजन केले आहे. या महोत्सवास चंद्रपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या महोत्सवात येणाऱ्यांची संख्या दररोज वाढत असून ४२ लाख रुपयांच्या वस्तुची विक्री झालेली आहे. पुढील दिवसात ७० लाख रुपयापर्यंत विक्रीची अपेक्षा आहे. उद्या ६ मार्च हा या सरस महोत्सव स्वयंसिध्दा - २०१७ चा अखेरचा दिवस असणार आहे.
दररोज चंद्रपूरकर कुंटुंबासमवेत भेट देत असून याठिकाणी बचत गटापासून निर्मित विविध वस्तु, खाद्य पदार्थांचा आंनद घेत आहे. कलाकसुरीच्या वस्तुसह खाद्य पदार्थाच्या स्टॉलकडे चंद्रपूरकरांची अलोट गर्दी दररोज दिसून येत आहे. यामुळे पाककला निपून बचत गटांच्या पदार्थांची अधिकाधिक विक्री होत आहे. सरस महोत्सवाला भेट देणाऱ्या लोकांची दररोज संख्या वाढत असून जिल्हा परिषदचे अधिकारी, कर्मचारी कुंटुंबासमवेत दररोज महोत्सवात असलेल्या स्टॉलला भेटी देत आहे. मोठ्या प्रमाणावर वस्तु खरेदी करीत आहे. याठिकाणी दररोज संध्याकाळी चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे महोत्सवास भेट देणाऱ्या चंद्रपूरकरांचे मनोरंजन होत आहे. बचत गटातील महिलांना व्यवसाय व्यवस्थापनाचे दररोज दुपारच्या सत्रात तज्ज्ञ सल्लागारांचे मार्गदर्शन मिळत आहे. याठिकाणी विविध स्टॉलवर मातीची कलाकसुरी, काष्टशिल्पातील विविध कलाकृती, बांबुपासून निर्मित विविधांगी साहित्य, तांदळाचे विविध प्रकार, गृहपयोगी बऱ्याच वस्तुचे याठिकाणी प्रदर्शन व विक्रीकरिता उपलब्ध आहेत. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी.सिह स्वत: प्रत्येक स्टालला भेटी देवुन निर्मित वस्तुविषयी महिला बचत गटातील महिलांकडून माहिती जाणून घेत आहेत. अशाच प्रकारच्या नाविण्यपुर्ण सुबक व आकर्षक वस्तु तयार करण्याची प्रेरणा देत आहे. चंद्रपूर जिल्हातील जनतेनी एकदा चांदा कल्ब ग्राऊंडवर चालु असलेल्या सरस महोत्सवास आवर्जुन भेट द्यावी, असे आवाहन आहे. (शहर प्रतिनिधी)