पोलीस बंदोबस्तात पेट्रोलची विक्री

By admin | Published: November 10, 2016 01:55 AM2016-11-10T01:55:50+5:302016-11-10T01:55:50+5:30

पाचशे व एक हजार रुपयाच्या नोटा चलनातून बंद होणार असल्याने बुधवारी सकाळपासूनच पेट्रोल भरण्याकरिता....

Sales of petrol in police custody | पोलीस बंदोबस्तात पेट्रोलची विक्री

पोलीस बंदोबस्तात पेट्रोलची विक्री

Next

५०० व १००० च्या नोटा निघाल्या बाहेर : चिल्लरवरुन वाद
वरोरा : पाचशे व एक हजार रुपयाच्या नोटा चलनातून बंद होणार असल्याने बुधवारी सकाळपासूनच पेट्रोल भरण्याकरिता ग्राहक पाचशे व एक हजार रुपयाची नोट घेवून येत होते. त्यामुळे चिल्लर देताना पेट्रोल पंप चालक व ग्राहकात तु-तु, मै-मै झाल्याने अनेक पेट्रोल बंद ठेवण्यात आले तर काही पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्तात पेट्रोल विक्री करण्यात आली.
पाचशे व एक हजार रुपयाच्या नोटा चलनात राहणार नाही, त्यामुळे ग्राहक सकाळी खरेदी करीता निघाताना पाचशे व एक हजार रुपयाच्या नोटा घेवून निघाले. पेट्रोल पंपावर या नोटा स्वीकारले जात होते. परंतु, प्रत्येक ग्राहक शंभर-दोनशे रुपयाचे पेट्रोल टाकताना पाचशे व एक हजार रुपयाची नोट देत असल्याने चिल्लर देताना पेट्रोल पंप चालकाची चांगलीच दमछाक उडत होती. चिल्लर अभावी अनेक पेट्रोल पंप बंद ठेवले होते. पेट्रोल टाकण्याकरिता आलेल्या ग्राहकांना आधी चिल्लर आहे काय, अशी विचारणा करताना दिसत होते. पाचशे व एक हजार रुपयाची नोट असल्यास तेवढ्याच रक्कमेचे पेट्रोल किंवा डिझेल टाकण्याचा आग्रह पेट्रोल पंप चालकाकडून केला जात होता. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर किरकोळ भांडणेही झाली. रत्नमाला चौकातील पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करुन पोलीस बंदोबस्तात पेट्रोल व डिझेलची विक्री करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sales of petrol in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.