शेतकऱ्याचा मुलगा झाला विक्रीकर अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:06 PM2018-05-14T23:06:56+5:302018-05-14T23:07:06+5:30
शिक्षण घेत असतानाच घरच्या शेतीकामात मदत करून शिक्षणाची जिद्द सोडली नाही. लहानपणापासूनच जिद्दी स्वभाव असल्याने विनोद विदुम भोयर या भूमिपुत्राने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवून मुलगा विक्रीकर अधिकारीपदासाठी पात्र ठरला़
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : शिक्षण घेत असतानाच घरच्या शेतीकामात मदत करून शिक्षणाची जिद्द सोडली नाही. लहानपणापासूनच जिद्दी स्वभाव असल्याने विनोद विदुम भोयर या भूमिपुत्राने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवून मुलगा विक्रीकर अधिकारीपदासाठी पात्र ठरला़
वरोरा तालुक्यातील आबवडगाव येथील विनोद भोयर याने वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर साखरा येथील किसान विद्यालयातून दहावी झाला़ या कालखंडात विनोदला वडगाव ते साखरा येथून पायी जावे लागत होते़ १२ वीपर्यंतचे शिक्षण बोथली येथील भिवाजी वरभे कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केल़ दरम्यान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून बी.ए.ची पदवी घेतली. पदवी घेत असताना ग्रामीण भागात राहूनच स्पर्धा परिक्षेची तयारी ुसुरू केली़ वडगावसारख्या ठिकाणी ग्रंथालयाची सुविधा नाही़ स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन मिळणे कठीणच होते़ अशा प्रतिकुल परिस्थितीमध्ये विनोदने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. वडील व भाऊ शेती करतात. भोयर कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असल्याने संपूर्ण कुटुंब शेतात राबते़ विनोदने शेतीला हातभार लावून अभ्यासाला नियमित वेळ देत होता़ परिस्थिती नसताना त्याने यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. गाव व परिस्थिती कशीही असो़ मनात खुणगाठ बांधल्यास यश संपादन करता येते, हे विनोद भोयर या तरुणाने दाखवून दिले आहे. विनोदन केवळ भाषा विषयाची खासगी शिकवणी लावली होती़ आईवडील, भाऊ, शिक्षक, मित्रांना मार्गदर्शन केल्याने यश मिळाले़ यापुढे उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न मनात ठेवून विनोदने तयारी सुरू केली आहे.