जुनोना येथे सांबराची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:16 PM2019-07-22T23:16:03+5:302019-07-22T23:16:18+5:30
जुनोना गावात लोकांनी सांबराची शिकार केल्याची माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गावात जाऊन शिकाऱ्यांची घरी धाड टाकली. आरोपीकडून सांबराचे कच्चे मांस, शिजलेली भाजी, शिकारीचे साहित्य ताब्यात घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जुनोना : जुनोना गावात लोकांनी सांबराची शिकार केल्याची माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गावात जाऊन शिकाऱ्यांची घरी धाड टाकली. आरोपीकडून सांबराचे कच्चे मांस, शिजलेली भाजी, शिकारीचे साहित्य ताब्यात घेण्यात आले.
वनविकास महामंळाच्या जंगलात कक्ष क्र.४८१ मध्ये काही लोकांनी सांबराची शिकार करून गावात आणून आपल्या घरी मासाची विक्री केली. याची गुप्त माहिती कर्मचाºयांना मिळाली. महामंडळाच्या कर्मचाºयांनी गावात येऊन धाड टाकली. या प्रकरणात मुख्य आरोपी सहा आहेत तर मास विकत घेणारे सहा आरोपी आहेत. १२ पैकी मुख्य आरोपी प्रकाश मंगरू दुर्याधन, शिशुपाल मंगरु दुर्योधन, मंगेश शिशुपाल दुर्योधन हे असून भिमराव भुजंग सिडाम, निलेश विजय रायपुरे, प्रदीप शंकर वेट्टी, सज्जनलाल रंगारी, रुपचंद गणवीर हे आरोपी अटकेत असून चार आरोपी फरार आहेत. आरोपींविरुध्द भारतीय वन अधिनियमान्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई डी.एफ.ओ. आत्राम, एसीएफ सोनुरकर, वनपरिक्षेत्राधिकारी शेख, मुंडे आदींनी केली.