संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:36 PM2017-12-29T23:36:38+5:302017-12-29T23:36:56+5:30

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचावे, म्हणून माध्यमिक उच्च माध्यमिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते.

Sambhaji Brigade's Dare movement | संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन

संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्देशिष्यवृत्तीकडे वेधले लक्ष : शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचावे, म्हणून माध्यमिक उच्च माध्यमिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र शैक्षणिक सत्र २०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८ तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीवर धरणे आंदोलन करण्यात आले.
संविधानातील तरतुदीनुसार बहुजन समाजाील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पण, शिष्यवृत्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पुढच्या वर्गात प्रवेश नाकारल्यामुळे मयुर येरणे नामक विद्यार्थ्याला आत्महत्या करावी लागली होती. यासंदर्भात संघटनेने जिल्हाधिकाºयामार्फत महाराष्ट्र मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री, विशेष जिल्हा समाज कल्याण मंत्री, व प्रकल्प अधिकाºयांना निवेदन पाठविले होते. परंतु, या मागणीकडे दुर्लक्षीत करण्यात आले. परिणामी, शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. या घटनेचा निषेध म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास ३ जानेवारी २०१८ ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुुले जयंतीदिनी महाराष्ट्रात भीक मांगो आंदोलन करू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक चंद्रकांत वैद्य, विभागीय अध्यक्ष विनोद थेरे, जिल्हाध्यक्ष प्रवीण काकडे, महानगराध्यक्ष प्रा. डॉ. सचिन बोधाने आदींनी दिला आहे. या आंदोलनात शेकडो विद्यार्थी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Sambhaji Brigade's Dare movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.