एकाच दिवशी आढळले ११ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 06:00 AM2020-06-08T06:00:00+5:302020-06-08T06:00:12+5:30
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित), २० मे ( एकूण १० बाधित ), २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ), २५ मे ( एक बाधित ), ३१ मे ( एक बाधित ), २ जून ( एक बाधित ), ४ जून ( दोन बाधित ), ५ जून ( एक बाधीत ), ६ जून ( एक बाधित ), ७ जून ( एकूण ११ बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोनाबाधित ३९ झाले आहेत. आतापर्यत २२ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील २२ कोरोना रुग्णांना सुटी दिल्यानंतर केवळ सहाच रुग्ण अॅक्टीव्ह होते. चंद्रपूर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असतानाच रविवारी एकाच दिवशी ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ३९ झाली आहे. यामध्ये मुंबईवरून आलेला चंद्रपुरातील शास्त्री नगर येथील ३१ वर्षाच्या पुरुष, नवी दिल्लीवरून गडचांदूर येथे आलेला २७ वर्षाचा युवक, जळगाववरून आलेला नागभीड तालुक्यातील तळोधी येथील ३६ वर्षाचा व्यक्ती, यवतमाळवरून आलेला नागभीड तालुक्यातील पुनघाडा रिठ या गावचा ३६ वर्षीय व्यक्ती, ओडिसा राज्यातून आलेला नागभीड तालुक्यातील विजापूर या गावातील ४० वर्षीय पुरुष, तसेच यवतमाळ येथून आलेला नागभीड शहरातील ४५ वर्षांचा पुरुष, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील दोन व्यक्तीसह ब्रह्मपुरी येथील कोविड केअर सेंटरमधील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या तीन व्यक्तींचा समावेश आहे.
यापैकी अडयाळ टेकडी येथील संपर्कातील दोघांना वगळता अन्य तीन नागरिकांमध्ये मुंबईवरून आलेला ४३ वर्षांचा व २७ वर्षांचा पुरूष आहे. तर गुजरातमधून आलेला कुडेसावली येथील एक व्यक्ती आहे.
असे मिळाले होते रुग्ण
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित), २० मे ( एकूण १० बाधित ), २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ), २५ मे ( एक बाधित ), ३१ मे ( एक बाधित ), २ जून ( एक बाधित ), ४ जून ( दोन बाधित ), ५ जून ( एक बाधीत ), ६ जून ( एक बाधित ), ७ जून ( एकूण ११ बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोनाबाधित ३९ झाले आहेत. आतापर्यत २२ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ३९ पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता १७ आहे.