एकाच दिवशी सहा लाखांचा दारूसाठा पकडला

By Admin | Published: April 12, 2015 12:43 AM2015-04-12T00:43:40+5:302015-04-12T00:43:40+5:30

१ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली आहे.

On the same day, caught 6 lakhs of dowry | एकाच दिवशी सहा लाखांचा दारूसाठा पकडला

एकाच दिवशी सहा लाखांचा दारूसाठा पकडला

googlenewsNext

अवैध विक्री सुरूच : आतापर्यंत जिल्ह्यात १५ लाखांवर दारू जप्त
बाबूपेठ (चंद्रपूर) : १ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली आहे. बंदीच्या काळात तळीरामांची गरज भागविण्यासाठी अवैध दारुविक्रत्यांनी दारूचा मोठा साठा साठवून ठेवला आहे. अशा दारु विक्रत्यांचा शोध घेत पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. असे असले तरी आजही छुप्या मार्गाने दारुची विक्री सुरुच आहे. दरम्यान काल शनिवारी रामनगर पोलिसांनी एकाच दिवशी तब्बल सहा लाखांची देशी-विदेशी दारु जप्त केली आहे. जिल्हात आजवर झालेल्या कारवायांमध्ये ही मोठी कारवाई मानली जात आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत जिल्ह्यात १५ लाखांपेक्षा अधिक किमतीची दारू पोलिसांनी पकडली आहे.
नागपूर मार्गावरील बलवीर सिंग चढ्ढा यांच्या बंद बिअरबारमध्ये दारूसाठा असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांनी बंद बारवर धाड टाकली. यात तब्बल १०० पेट्या विदेशी दारु आढळून आली. या दारुची किंमत सहा लाख रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. हा दारुचा साठा बारमागील टिनेच्या शेडमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. हा दारु साठा छुप्या मार्गाने विकला जात असावा, असा पोलिसांचा अदांज आहे. आतापर्यंत झालेल्या दारूविरुध्दच्या कारवायांमध्ये रामनगरची ही कारवाई सर्वात मोठी आहे. ही कारवाई ठाणेदार प्रल्हाद गिरी, डिबी पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक बारसे, श्याम बारसागडे, प्रमोद कोटनाके राकेश बंजारीवाले, बलकी, बोरीकर, तिवारी आदींनी केली. (प्रतिनिधी)

जलनगरमधील दारू अड्डे उद्ध्वस्त
दारूबंदीनंतर सध्या जलनगरमधील दारुविक्री जोमात सुरु होती. या दारु विक्रीवर आळा बसविण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. या परिसरात होत असलेल्या दारु विक्रीमुळे पोलिसांविषयी जनतेचा रोषही वाढत चालला होता. पोलिसांनी अनेकदा या परिसरात धाडी मारल्या. पण ठोस असे काही हाती आले नाही. यामुळे पोलीसही अस्वस्थ होते. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या मार्गदक्षनाखाली पोलीस मुख्यालय व रामनगरचे ठाणेदार प्रल्हाद गिरी यांच्या उपस्थितीत पोलिसांनी शनिवारीच जलनगरमध्ये सर्च मोहीम सुरु केली होती. यात पोलीसांनी सात आरोपींना अटक करुन ५० हजाराचा देशी दारुचा माल जप्त केला आहे. हा दारुसाठा झुडुपांमध्ये तर काही साठा तलावातील पाण्यात लपवून ठेवण्यात आला होता. अटक केलेल्या अरोपींमध्ये महिलांचा समावेश असून गिता खंजर, मंदा खंजर, उषा खंजर, आरती खंजर, मिरुपा खंजर, शांती खंजर, घनशाम खंजर अशी आरोपींची नावे आहेत.

‘एकच प्याला’साठी तळीरामांची जिल्ह्याबाहेर धाव
गोवरी : चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून राज्य शासनाने दारूबंदीचा निर्णय घेऊन कठोर अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे नेहमी दारू पिणाऱ्या मद्यपींची चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यामुळे दारूची हौस पुरविण्यासाठी तळीरामांनी जिल्हाबाहेर धाव घेतली आहे. चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत. जिल्ह्यात दारूचा महापूर सुरू असताना चंद्रपूर जिल्ह्याला दारूमुक्त करावे अशी हाक सामाजिक संघटनांनी दिली होती. निवडणूक काळात दारूबंदीचा शब्द देणारे राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजयाचा जल्लोष साजरा करीत चंद्रपूर जिल्हा दारूबंदीवर शिक्कामोर्तब केले. यासाठी जिल्ह्यातील महिलांचा सहभाग मोठा आहे. राज्य शासनाने १ एप्रिलपासून घेतलेल्या चंद्रपूर जिल्हा दारूबंदीच्या निर्णयाने तळीरामांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्याला यवतमाळ, गडचिरोली व तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने दारूची हौस पुरविण्यासाठी मद्यपी जिल्हाबाहेर जाऊन दारूचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत. यासाठी ते जिल्ह्याबाहेरील नातेवाईकांकडे जाऊन मुक्कामाला राहून दारूची हौस पुरविताना दिसत आहे. यातून जिल्हाबाहेरून दारूची तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध धाडसत्र मोहीम धडाक्यात सुरू आहे. मात्र तळीरामांनी जिल्ह्याबाहेर जाऊन दारू पिण्याचा नवा फंडा अवलंबला असल्याने पोलीस यंत्रणा काही प्रमाणात हतबल आहे. पोलिसांनी दारू पिणाऱ्यावर आठवडाभरापासून करडी नजर ठेवली असून जिल्ह्याबाहेर सीमेवर दारूची तस्करी रोखण्याच्या उद्देशाने पोलिसांकडून नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: On the same day, caught 6 lakhs of dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.