महाकालीच्या दरबारात दीड महिन्यापासून सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 12:41 AM2020-05-07T00:41:26+5:302020-05-07T00:49:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ऐतिहासिक महाकाली मंदिर दीड महिन्यापासून भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. यावर्षी ...

Samsum in the court of Mahakali for a month and a half | महाकालीच्या दरबारात दीड महिन्यापासून सामसूम

महाकालीच्या दरबारात दीड महिन्यापासून सामसूम

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : लघु व्यावसायिकांच्या उदरनिर्र्वाहाचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ऐतिहासिक महाकाली मंदिर दीड महिन्यापासून भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. यावर्षी चैत्र महिन्यातील यात्राही जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून रद्द करण्यात आली. त्यामुळे पुजेचे साहित्य तसेच अन्य वस्तु विकणाऱ्या व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेतले होते. परंतु, संपूर्ण व्यवसाय बंद असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्रातील मंदिरासह, सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली. यामध्ये महाकाली मंदिराचाही समावेश आहे. भाविकांसह हळदी-कुंकवाचे दुकाने, फिरते व्यावसायिकांनी गजबजलेला परिसर सध्या ओस दिसत आहे. महाकाली देवीच्या मंदिरावर अवलंबून असलेल्या व्यावसायिक व त्यांच्याकडे काम करणारे शंभरहून अधिक कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाकाली मंदिर बंद असल्याने बांगड्या विकणाऱ्या महिला व फिरते विक्रेत्यांच्या हाताला काम नाही. माता महाकाली मंदिरात दरदिवशी शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. यामध्ये विदर्भातील गडचिरोली, भंडारा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, अमरावती जिल्ह्यातील भाविकांची संख्या लक्षवेधी असते.

गाभाऱ्यातच पूजा
नांदेड जिल्ह्यातून हजारो भाविक चैत्र यात्रेसाठी येतात. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यापूर्वी महाकाली मंदिर व्यवस्थापनाने यात्रेची तयारी केली होती. दरम्यान, राज्यात कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर यात्रा होणार की नाही, याविषयी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंदिर व्यवस्थापनाची बैठक घेतली. याबैठकीत यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून मंदिराची दारे बंद आहेत. मंदिर परिसराची नियमित स्वच्छता केली जात असून केवळ गाभाऱ्यात पूजा केली जाते.

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार चैत्र यात्रा भरविण्यात आली नाही. कोरोना प्रतिबंधासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू झाले. व्यवस्थापनाकडून त्याचे पालन केले जात आहे. याचाच भाग म्हणून मंदिर व्यवस्थापनाकडून जिल्हा प्रशासनाला मदत निधी देण्यात आला आहे.
- सुनील नामदेव महाकाले, अध्यक्ष महाकाली मंदिर ट्रस्ट, चंद्रपूर

Web Title: Samsum in the court of Mahakali for a month and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.