नुकसान भरपाईसाठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्रा्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:24 AM2021-02-15T04:24:58+5:302021-02-15T04:24:58+5:30
या वन परिक्षेत्रात जंगल मोठ्या प्रमाणात आहे. वन्यप्राणीसुद्धा खूप आहे. त्यामुळे वन्यप्राणी रात्री शेतात घुसून शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात ...
या वन परिक्षेत्रात जंगल मोठ्या प्रमाणात आहे. वन्यप्राणीसुद्धा खूप आहे. त्यामुळे वन्यप्राणी रात्री शेतात घुसून शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. तसेच पाळीव प्राण्यावर वाघाचे हल्ले होतात. त्यामुळे पशुपालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. अशा घटनेची वनविभागाला सूचना दिली जाते. वनरक्षक येऊन शेतपिकाचे व मृत पाळीव प्राण्याचे पंचनामे करून ते प्रकरण वनपरिक्षेत्र अधिकारीमार्फत मंजुरीसाठी पाठविण्यात येते. परंतु आठ महिन्यापासून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्याला मिळाली नाही. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मदतीपासूनही वंचित राहावे लागत आहे. मदत लवकर देण्यात यावे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे मदन खामनकार यांनी दिला आहे.
कोट
२५ टक्के निधी आला आहे. तो सन २०१९- २० या वर्षीच्या शिल्लक केसेसमध्ये वाटप करीत आहोत. पण या वर्षी निधी न आल्याने वाटप करण्यात आले नाही. -पी.जी. कोडापे, सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर