अभयारण्यमुळे वाघांचा भ्रमणमार्ग सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 05:00 AM2020-12-06T05:00:00+5:302020-12-06T05:00:39+5:30
तेलंगणातील कवल, इंद्रावती, टिपेश्वर, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा कन्हाळगाव व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. या मार्गाने वाघांची भ्रमंती सूरू असते. कन्हाळगाव अभयार अंतर्गत कोठारी, तोहोगाव, कन्हाळगाव, धाबा वनक्षेत्राचा समावेश आहे. अभयारण्य घोषित झाल्याने व्याघ्र संवर्धनात मोठी भर पडणार, असा दावा वन अधिकारी करीत आहेत. राज्याचे माजी वनमंत्री सूधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने कन्हाळगाव अभयारण्याला १३ व्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत तत्वत: मान्यता प्रदान करण्यात आली होती.
निलेश झाडे / प्रमोद येरावार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : जिल्ह्यातील दक्षिणेकडील कन्हाळगाव हा सुरक्षित व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने वाघांचा भ्रमणमार्ग सशक्त होणार, असा दावा पयार्वरणवाद्यांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या अभयारण्याला सूरवातीपासूनच काही गावांचा विरोध होता. अभयारण्य घोषित झाल्याने पारंपरिक वन हक्कांवर गदा आणू नका, अशी मागणी करू लागले आहेत.
तेलंगणातील कवल, इंद्रावती, टिपेश्वर, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा कन्हाळगाव व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. या मार्गाने वाघांची भ्रमंती सूरू असते. कन्हाळगाव अभयार अंतर्गत कोठारी, तोहोगाव, कन्हाळगाव, धाबा वनक्षेत्राचा समावेश आहे. अभयारण्य घोषित झाल्याने व्याघ्र संवर्धनात मोठी भर पडणार, असा दावा वन अधिकारी करीत आहेत. राज्याचे माजी वनमंत्री सूधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने कन्हाळगाव अभयारण्याला १३ व्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत तत्वत: मान्यता प्रदान करण्यात आली होती.
अशा आहेत ग्रामस्थांच्या विविध मागण्या
प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला अभयारण्यात रोजगार द्यावा, निस्तार हक्कांची गरज पूर्ण करावी, जंगलावरील गावाचा हक्क कायम ठेवावा, तेंदुपता संकलन हंगाम बंद करू नये, वन्यजीवापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी, स्थानिकांना शाश्वत रोजगाराची
हमी द्यावी.
नागरिकांचा सुरूवातीपासूनच विरोध
कन्हाळगाव अभयारण्याला नागरिकांचा सुरवातीपासूनच विरोध होता. त्यात काही राजकीय नेत्यांनी अभयारण्याचा विषयाला हात घातल्याने विरोध अधिक तीव्र झाला होता. अभयारण्याबाबत नागरिकांची मते घेण्यासाठी १८ ग्रामपंचायती व गट ग्रामपंचाय अंगर्तत ३३ गावात विशेष ग्रामसभा घेण्यात आल्या होत्या. या ग्रामसभांमध्ये नागरिकांनी प्रस्तावित अभयारण्याच्या विरोधात मते मांडली होती.