लिलावाअभावी रेती तस्करांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:00:38+5:30
सात महिन्यांपासून रेती घाटाचा लिलाव झाला नाही. तालुक्यात खासगी व सरकारी कामे सुरू आहेत. त्याचा फायदा घेत रेती तस्कर सक्रीय झाले. तस्करांनी रेतीची वाहतुक करताना त्रास होवू नये, यासाठी काही दिवसांपूर्वी चिरोली व केळझर येथील साठा तयार करून ठेवला होता. तहसीलदाराने माहिती मिळताच केळझर येथील २० ब्रास, सारजखेडा ११ ब्रास आणि मंदातुकूम येथील ६५ ब्रास रेती जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खासगी व सरकारी बांधकामे होत असल्याने रेती तस्करांचा धुमाकूळ सुरू ्रआहे.
केळझर, मंदातुकूम व सारजखेडा येथील रेतीसाठा अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. काही दिवसांपूर्वी या साठाचा लिलाव झाला. मात्र सदर साठावर नदीमधून रेतीची वाहतूक केल्या जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सदर रेती साठ्याची तात्काळ चौकशी करून फेरमोजणी करण्याची मागणी केली जात आहे. चिरोली व केळझर भरदिवसा रेतीची वाहतूक केली जाते.
सात महिन्यांपासून रेती घाटाचा लिलाव झाला नाही. तालुक्यात खासगी व सरकारी कामे सुरू आहेत. त्याचा फायदा घेत रेती तस्कर सक्रीय झाले. तस्करांनी रेतीची वाहतुक करताना त्रास होवू नये, यासाठी काही दिवसांपूर्वी चिरोली व केळझर येथील साठा तयार करून ठेवला होता. तहसीलदाराने माहिती मिळताच केळझर येथील २० ब्रास, सारजखेडा ११ ब्रास आणि मंदातुकूम येथील ६५ ब्रास रेती जप्त केला. या रेतीसाठ्याचा लिलाव झाला आहे. मात्र, काही अंतरावरच अंधारी नदी असल्याने पुन्हा तस्करी केली जाते.
मूल तालुक्यातील केळझर, सारजखेडा व मंदातुकूम येथील रेती साठा जप्त करून लिलाव करण्यात आला होता. त्यापैकी केळझर आणि सारजखेडा येथील रेती कंत्राटदारांनी उचल केली. मंदातुकूम येथील रेतीसाठा लिलाव झाला. मात्र, रेतीची उचल करण्यात आली नाही. या ठिकाणी अवैध रेतीसाठा होत असेल तर चौकशीनंतर कारवाई करू.
- डी. जी. जाधव, तहसीलदार, मूल