शासकीय कामावर तस्करांची रेती, घरकुलासाठी मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:26 AM2021-03-20T04:26:15+5:302021-03-20T04:26:15+5:30
तळोधी बाः अप्पर तळोधी बा. तालुक्यातील वाढोणा, सावरगांव, चिखलगाव घाटावर अवैध रेती तस्करांनी जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन करून मोठ्या ...
तळोधी बाः अप्पर तळोधी बा. तालुक्यातील वाढोणा, सावरगांव, चिखलगाव घाटावर अवैध रेती तस्करांनी जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन करून मोठ्या कामासाठी रेती घाट पोखरुन काढले आहे. दुसरीकडे घरकूल लाभार्थी रेतीसाठी धडपड करीत आहे. याप्रकरणी घाटाचीचा मोजणी करून रेती तस्करांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वाढोणा, चिखलगाव, सावरगाव रेती घाटावर रेती तस्करांनी रस्ते तयार करून मोठ्या प्रमाणात रेतीची साठवणूक केली आहे. हायवा व ट्रॅक्टरने शासकीय व गोसेखुर्द कालव्याच्या मार्गावरील पुलाच्या कामासाठी रेती तस्करी सुरू आहे. मात्र महसूल विभागाचे अधिकारी रेती तस्करधारकांकडून ट्रॅक्टरमागे कमिशन घेत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे दिवसरात्र रेतीची तस्करी होत असतानाही पोलीस व महसूल विभागाच्या वतीने कारवाई केली जात नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे रेतीपासून शासनाला मिळणारे कोट्यवधी रुपयाचा महसूल पाण्यात जात आहे. रेती तस्करांकडून घाटावर रस्ते तयार करून खनन केलेल्या जागेवर घरकुलासाठी मात्र रेतीची वाहतूक करण्यास मज्जाव केला जात आहे. शासकीय कामावर अवैधरित्या रेतीची तस्करी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.