बल्लारपूर तालुक्यात रेती तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:34 AM2021-09-10T04:34:05+5:302021-09-10T04:34:05+5:30

प्रमोद येरावार कोठारी : तालुक्यात अवैध रेती उपसा करून राजरोसपणे वाहतूक करण्याचा कारभार मागील अनेक महिन्यांपासून जोमात सुरू आहे. ...

Sand smuggling in Ballarpur taluka | बल्लारपूर तालुक्यात रेती तस्करी

बल्लारपूर तालुक्यात रेती तस्करी

googlenewsNext

प्रमोद येरावार

कोठारी : तालुक्यात अवैध रेती उपसा करून राजरोसपणे वाहतूक करण्याचा कारभार मागील अनेक महिन्यांपासून जोमात सुरू आहे. तालुका प्रशासन नॉट रिचेबल असल्याचा प्रत्यय अनेक नागरिकांना येत आहे. हा अवैध रेती तस्करीचा व्यापार कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. या मागील शुक्राचार्य कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तालुक्यातील कोठारी, किन्ही, दहेली, पळसगाव, हरणपायली रिठ आदी गावातील महसुली व जंगल व्याप्त भागातील नाल्यातून तसेच गावाशेजारील नाल्यातून वर्दळीच्या मार्गालगत सुद्धा रेतीचा अवैध उपसा करून वाहतूक तसेच साठा करण्यात येत आहे. हा प्रकार स्थानिक गाव तलाठी, मंडल निरीक्षक, नायब तहसीलदार, व तहसीलदार यांना माहिती असून देखील त्याकडे दुर्लक्ष करून रेती तस्करीच्या अवैध व्यवसायाला हातभार लावत आहे. कोठारी व येनबोडी, किन्ही या मुख्य रस्त्यावर असलेल्या नाल्यातून डांबरी रस्त्यावर वाहने उभी करुन राजरोसपणे रेती भरण्यात येते. मार्गावरील उभ्या वाहनांच्या गर्दीने त्यावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांना नाहक त्रास होत आहे. या नाल्याच्या आजूबाजूला रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळ व रात्री रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वेढा असतो. किमान दहा ते पंधरा वाहने रेती भरण्यासाठी उभे असतात. त्यातच नाले तुडुंब भरले असले तरी कंबरभर पाण्याच्या तळातून मजुरांमार्फत रेतीचा उपसा केला जात आहे. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक महसूल कर्मचारी व अधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती देण्यासाठी संपर्क साधतात. मात्र संबंधित अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी नॉट रिचेबल असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. रेतीचे भाव गगनाला भिडले असून प्रति ट्रॅक्टर चार हजार ते पाच हजार रूपये या किमतीत विकल्या जात आहे. गावातील घरकुलाची कामे सुरू असून गोरगरिबांच्या घराचे स्वप्न रमाई योजनेच्या माध्यमातून साकार होत असले तरी चढत्या रेतीच्या भावाने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडत आहे.

बॉक्स

घाटांचे लिलाव नाही

बल्लारपूर तालुक्यात रेती घाटाचे शासकीय लिलाव झालेले नाही. मात्र रेतीचा भरमसाठ उपसा करून शासनाचा कोट्यवधींचा महसूल अवैध व्यवसायाला हातभार लावून बुडवला जात आहे. महसूल न भरता अवैध रेतीचे भाव तस्करांनी वाढवून सर्वसामान्यांची लूट चालविलेली आहे. तालुका प्रशासन कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यास धजावत नसल्याने रेती वाहतूक राजरोसपणे सुरू आहे.

090921\img-20210908-wa0015.jpg

pramod yerawar

Web Title: Sand smuggling in Ballarpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.