जमनजट्टी परिसरातून रेती तस्करी, चार वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:29 AM2021-05-19T04:29:05+5:302021-05-19T04:29:05+5:30

चंद्रपूर : सध्या जिल्हा प्रशासन कोरोना प्रादुर्भावाच्या प्रतिबंधासाठी प्रयत्न करीत आहे. हीच संधी साधत, काही रेती तस्कर आपले हात ...

Sand smuggling from Jamanjatti area, four vehicles seized | जमनजट्टी परिसरातून रेती तस्करी, चार वाहने जप्त

जमनजट्टी परिसरातून रेती तस्करी, चार वाहने जप्त

Next

चंद्रपूर : सध्या जिल्हा प्रशासन कोरोना प्रादुर्भावाच्या प्रतिबंधासाठी प्रयत्न करीत आहे. हीच संधी साधत, काही रेती तस्कर आपले हात ओले करून घेत मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करीत आहेत. यासंदर्भात माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी, तसेच सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पथकासह येथील जमनजेट्टी परिसरामध्ये धाड टाकून चार वाहने रेतीची तस्करी करताना जप्त केले.

मागील काही दिवसांपासून कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य नागरिक घरी अडकले आहेत, तर प्रशासनाने कोरोना प्रादुर्भावाच्या प्रतिबंधासाठी रुग्णालय व्यवस्था, ऑक्सिजन पुरवठा, लसीकरणाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. एवढेच नव्हे तर रेल्वे, तसेच इतर मार्गाने बाहेरून येणाऱ्या प्र‌वाशांचीही तपासणी

करून प्रादुर्भाव कसा टाळता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, हीच संधी साधत काही तस्कर रेतीची तस्करी करीत शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडवीत आहेत. चंद्रपूर येथील जमनजट्टी परिसरातून रेतीची तस्करी केली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी पथकासह नदीपात्रात धाड टाकली. यावेळी रेतीची तस्करी करताना तीन ट्रॅक्टर, तसेच एक हाॅपटन आढळून आले. ही वाहने पथकाने जप्त केली असून, त्यांच्या मालकांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई उपविभागीय अधिकारी रोहन घुगे यांच्या नेतृत्वामध्ये नायब तहसीलदार सचिन खंडाळे, विशाल कुरेवार, तलाठी प्रवीण वरभे आदींनी केली.

बाॅक्स

ही वाहने केली जप्त

एमएच ३४ एफ १६६

एचएच ३३ एफ ३३२२

एमएच ३४ एल ३३०४

एमएच ३४ एच २३८०

बाॅक्स

जिवावर उदार होऊन रेतीची तस्करी

सध्या कोरोना महामारीमुळे प्रत्येक नागरिक दहशतीत आहे. मात्र, काही जण जिवावर उदार होऊन वाटेल त्या मार्गाने रेती तस्करी करून रेतीची वाहतूक करीत आहेत. यामुळे ट्रॅक्टर मालक, चालक, तसेच मजुरांच्या जिवाचीही पर्वा करीत नाहीत. चोरीच्या मार्गातून अधिक नफा कमाविण्यासाठी ते जिवावर उदार होऊन रेती तस्करी करीत आहेत. या प्रकरणामध्येही काही ट्रॅक्टर चालक नदीच्या पात्रामध्ये अक्षरश: पाण्यातून ट्रॅक्टरद्वारे रेती तस्करी करीत असल्याचे बघायला मिळाले.

Web Title: Sand smuggling from Jamanjatti area, four vehicles seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.