ध्येयवेड्या मित्रांचा चंदन लागवडीचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:07 PM2018-07-10T23:07:38+5:302018-07-10T23:08:05+5:30

हरित मित्र परिवाराचे वरोरा तालुका प्रमुख किशोर उत्तरवार हे गेल्या तीन वर्षांपासून चंदन वृक्षाबाबत शेतकºयांमध्ये जनजागृतीचे काम करीत असून आजपर्यंत हजारो वृक्ष त्यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातच नव्हे चंद्रपूर जिल्हातील विविध भागात लावले गेले आहेत.

Sandalwood cultivation fat of friends | ध्येयवेड्या मित्रांचा चंदन लागवडीचा वसा

ध्येयवेड्या मित्रांचा चंदन लागवडीचा वसा

googlenewsNext
ठळक मुद्देगावागावात जनजागृती : तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी लावले चंदनाचे वृक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : हरित मित्र परिवाराचे वरोरा तालुका प्रमुख किशोर उत्तरवार हे गेल्या तीन वर्षांपासून चंदन वृक्षाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचे काम करीत असून आजपर्यंत हजारो वृक्ष त्यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातच नव्हे चंद्रपूर जिल्हातील विविध भागात लावले गेले आहेत. यावर्षी त्यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन तालुक्यात पाच हजार चंदनाचे वृक्ष सहयोगातून लावण्याचा संकल्प केला असून सोशल मीडियावरुनही ते चंदनवृक्ष लागवडीचा संदेश देत आहेत. या ध्येयवेड्या मित्रांचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
तीन वर्षांपूर्वी मराठवाड्यातील दत्तात्रय बगदुरे रा. होसूर ता.निलंगा जिल्हा लातूर या शेतकºयाने १२ एकर शेतात छंदाच्या झाडाची लागवड केल्याचा लेख किशोर उत्तरवार यांनी वाचला. तो लेख वाचून प्रभावित होऊन ते मित्रांसोबत होसूरला गेले. तिथे त्या शेताची पाहणी केली. या पद्धतीचा वापर आपल्या विदर्भातील, आपल्या जिल्ह्यातील शेतकºयांनी केला तर शेतकºयांची आर्थिक स्थिती सुधारू शकते, असे त्यांना वाटले. हा निर्धार करूनच ते स्वगावी परतले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चंदनाच्या वृक्षांबाबत माहिती प्रसिद्ध करायला सुरुवात केली व पाहता पाहता तीन वर्षात जवळपास १० हजार चंदनाचे वृक्षे वरोरा शहर, तालुका, तसेच आजूबाजूच्या परिसरात लावण्यात आली. त्यातील ९० टक्के वृक्ष वाचले असून बºयाच वृक्षांची ऊंची २० फूट झाली आहे. याबाबत अधिक माहिती विचारली असता उत्तरावर यांनी सांगितले की यासाठी त्यांनी कुठलीही शासकीय मदत घेतली नाही.
आपल्या मित्र परिवाराच्या आर्थिक सहयोगातून व सोशल मीडियाचा वापर करून चंदन वृक्ष लागवडीचे व मार्गदर्शनाचे कार्य गेल्या तीन वर्षांपासून अविरत सुरु आहे. चंदनाचे झाड हे सर्व वृक्षांपेक्षा आॅक्सिजनपूरक असून चंदन वृक्ष लागवडीमुळे भविष्यात पर्यावरण संतुलित राहून समृद्धीकडे वाटचाल होऊ शकते, ते म्हणाले. या उपक्रमाला व चंदन वृक्ष लागवडीला शासनानेही सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. चंदनाचे वृक्ष सर्व वृक्षांपेक्षा अधि प्राणवायू जास्त सोडत असल्याने मानवाच्या आरोग्यासाठी आणि चंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला भाव असल्याने शासनाने शासकीय जमिनीवर चंदनाची लागवड करून त्याचे संवर्धन केल्यास भविष्यात शासनाच्या तिजोरीत हमखास भर पडेल, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विदर्भाचे, त्यात मुख्यत: चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान उष्ण आहे. चंदनाच्या वृक्षाला मोठे होण्याकरिता साधारणत: उष्ण तापमानाची गरज असते. गेल्या तीन वर्षांपूर्वी तालुक्यात चंदनाच्या वृक्षाबद्दल शेतकºयांमध्ये असणाºया अनेक शंकांना दूर करण्याचेच काम न करता स्वखर्चाने अनेकांना चंदन वृक्ष भेट देऊन त्यांच्या शेतात व घरी चंदनाचे वृक्ष लावले. त्यांच्या या ध्येयवेडेपणामुळे अनेकांना चंदन वृक्षाबद्दल आकर्षण वाढायला लागले व पाहता पाहता त्यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाची ख्याती पंचक्रोशीत पोहचली. सध्या दिवसभर चंदन वृक्षांच्या माहितीसाठी दूरवरून त्यांच्या फोन येत असतात. यावर्षी पाच हजार चंदन वृक्ष लागवडीच्या संकल्पांतर्गत जवळपास पंधराशे वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या कामात त्यांचे मित्र स्वप्नील देवाळकर, आशिष ठाकरे, खेमराज कुरेकर, लोकेश पांढरे, अविनाश देवतळे, बाळू नेमाडे, आनंद गुंडांवर, सुनील गायकवाड व मित्रांचे सहकार्य आहे. चंदन तशी मौल्यवान वस्तू. शेतकºयाचे खरे सोनेच म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे शेतकºयांनीही या वृक्षाची लागवड करण्याची गरज आहे.

Web Title: Sandalwood cultivation fat of friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.