मदनापूर येथे साने गुरुजी जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:23 AM2020-12-26T04:23:21+5:302020-12-26T04:23:21+5:30
चिमूर : खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे, अशी जगाला शिकवण देणारे थोर लेखक, समाज सुधारक, स्वातंत्र्य ...
चिमूर : खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे, अशी जगाला शिकवण देणारे थोर लेखक, समाज सुधारक, स्वातंत्र्य सेनानी, आदर्श शिक्षक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांची जयंती जय लहरी जय मानव विघालय मदनापूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी साक्षी रंदये, वतन गोंडाणे या विद्यार्थ्यांनी साने गुरुजींच्या मुल्य शिकवणी पर भाषणात कथात्मक विचार केले. मुख्याध्यापक बी.ए . जिवतोडे यांनी साने गुरुजी यांच्या जिवनावर प्रकाश टाकला . भास्कर बावणकर यांनी श्यामची आई या पुस्तकांमधील महत्वांची दाखले समोर मांडत जिवनात उच्च ध्येय्य ठेवण्याचे मार्गदर्शन केले . याप्रसंगी जांभुळे उपस्थित होते. संचालन प्रणाली मगरे, आभार प्रदर्शन तन्नु बोरुले हिने केले .