मिस्टर अॅन्ड मिस महाराष्ट्र स्पर्धेत सानियाचे सुयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:47 PM2017-08-21T22:47:32+5:302017-08-21T22:47:53+5:30
ग्लोबल इव्हेंट मॅनेजमेंट नागपूरद्वारा आयोजित मिस्टर एंड मिस महाराष्ट्र या राज्यस्तरीय स्पर्धेत सोमय्या पॉलिटेक्निक चंद्रपूर येथील ....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्लोबल इव्हेंट मॅनेजमेंट नागपूरद्वारा आयोजित मिस्टर एंड मिस महाराष्ट्र या राज्यस्तरीय स्पर्धेत सोमय्या पॉलिटेक्निक चंद्रपूर येथील इलेक्ट्रानिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थिनी सनिया खान हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
सदर स्पर्धा एकूण दोन फेºयामध्ये पार पडली. यामध्ये पहिली फेरी ही सर्वसाधारण आणि दुसरी फेरी ही डिझाईनिंग या प्रकारात होती. द्वितीय फेरीत एकूण सात स्पर्धकांची निवड करण्यात आली होती त्यामधून सनिया खान हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, मुंबई, ठाणे, नागपूर, चंद्रपूर इत्यादी शहरातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून रोहित खंडेलवार, खुशब रेवतकर उपस्थित होत्या. सनिया खानने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर, प्राचार्य श्रीकांत गोजे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.