१०८ एनसीसी कॅडेटकडून स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:27 AM2020-12-22T04:27:30+5:302020-12-22T04:27:30+5:30
२१ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर विजय भास्कर व एडम ऑफिसर गौस बेग यांच्या मार्गदर्शनात महात्मा फुले महाविद्यालयातील सीटीओ प्रा. ...
२१ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर विजय भास्कर व एडम ऑफिसर गौस बेग यांच्या मार्गदर्शनात महात्मा फुले महाविद्यालयातील सीटीओ प्रा. योगेश टेकाडे यांच्या नेतृत्वात कोरोना नियमाचे पालन करून एनसीसीचे १०८ कॅडेट्स या स्वच्छता अभियानात शामिल झाले. शहरातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. महाविद्यालय परिसर,शिवाजी वॉर्ड,सार्वजनिक उद्यान, खांडक्या बल्लारशाहाची समाधी, बल्लारपूरचा ऐतिहासिक किल्ला परिसरातील सफाई करण्यात आली. डॉ. पंकज कावरे यांनी मार्गदर्शन केले. उत्कृष्ठ काम करणाऱ्या एनसीसी कॅडेटचा सत्कार प्राचार्य ज्योती भुते यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. स्वप्नील बोबडे, डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा.योगेश टेकाडे, एनसीसी कॅडेट्स,व प्राध्यापक उपस्थित होते. संचालन बरखा यादव यांनी केले. आशिष भोयर यांनी आभार मानले.