नेफडो राजुरा च्या वतीने स्वच्छता अभियान.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:26 AM2020-12-24T04:26:09+5:302020-12-24T04:26:09+5:30
- संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी स्वच्छता अभीयानाने केली साजरी. राजुरा 20 डिसेंबर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास ...
- संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी स्वच्छता अभीयानाने केली साजरी.
राजुरा 20 डिसेंबर
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा तर्फे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त राजुरा येथे स्वच्छता अभियान राबवीन्यात आले. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग सचिव बादल बेले, राजुरा शहर अध्यक्ष संदीप आदे , संघटक उमेश लढी, तालुका संघटक आशीष करमरकर ,आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक एस.डी.जांभूळकर आदिंचि उपस्थिति होती.
नेफडो राजुरा च्या वतीने नेहमी वेगवेगळे उपक्रम घेण्यात येतात. पर्यावरण संवर्धन सोबतच मानवता विकासाकरीता ही संस्था नेहमी कार्यरत असते. वृक्षारोपण सोबतच गरजूना मोफत कपड़े ,धान्यकीट ,किराणा साहित्य ,ब्लन्केट वितरण करने. सभासदांचा वाढदिवस वृक्षलागवडीने साजरा करने आदींसह स्वच्छता अभियान ,कोविड -19 बाबत जनजागृती करने ,मास्क वाटप करने इत्यादि उपक्रमात नेफडो ने पुढाकार घेऊन ते कार्य केले आहे. संत गाडगेबाबा पुण्यतिथि निमित्त स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.