जिल्हा कारागृहात स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:36 AM2017-09-10T00:36:36+5:302017-09-10T00:37:06+5:30

स्थानिक जिल्हा कारागृहात जिल्हा कारागृह अधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Sanitation campaign in District Jail | जिल्हा कारागृहात स्वच्छता अभियान

जिल्हा कारागृहात स्वच्छता अभियान

Next
ठळक मुद्देकारागृह अधीक्षकांचा पुढाकार : बंदी बांधवांना आरोग्यावरही केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्थानिक जिल्हा कारागृहात जिल्हा कारागृह अधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी बंदी बांधवांनी ‘हमे सुधरके जाना है, फिर वापस नही आना हे’ अशा घोषणा देत स्वच्छता अभियानाला बंदी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कारागृहातील बंदी बांधवांच्या आरोग्य विषयक समस्यावर मार्गदर्शन करताना अधीक्षक डॉ. भाईदास ढोले, म्हणाले, स्वस्थ शरिरामध्ये स्वस्थ मन वास करते. त्यामुळे आपले शरीर आपला परिसर स्वच्छ ठेवा, आपल्या मनाचा मैल आधी दूर करा. म्हणजे कोणताच आजार आपणास जडणार नाही, असे प्रतिपादन केले. कारागृहातील स्वच्छता अभियानाला प्रेरित होऊन बंदी वॉचमन सुनिल तुळशीराम टेकाम, शाम राजन बधर्तीवार, सयनु किसना धुर्वा, आकाश पुरुषोत्तम जोशी, सुधाकर भिमा जबोड, सुभाष मोरेश्वरे धनविजय, मुकेश विभीषण कन्नाके, अजय महिपाल चव्हान, गिरीष डाहाट, संतोष भोयर, शुभम राऊत, बंटी हेमके, विवेक मडावी, संजय गेडाम, विठ्ठल बावणे, संतोष जुनघरे, सचिन शेंडे, मनोहर कुळसंगे, मंगेष पोईनकर, हरिदास चौधरी, रमेश शेट्टी, सत्यम गावडे, कलीम अन्सारी आदी बंदी बांधवांनी परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा निर्धार घेत शपथ घेतली. त्यानंतर संपूर्ण कारागृह परिसर स्वच्छ करायला सुरुवात केली. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ तुरुंगाधिकारी वैभव आत्राम, तुरुंगाधिकारी सुनिल वानखडे, नागनाथ खैरे, विठ्ठल पवार, सुभेदार उमरेडकर यांनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Sanitation campaign in District Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.