जलशक्ती मंत्रालय राबवणार स्वच्छता लघुपट स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:33 AM2021-07-14T04:33:04+5:302021-07-14T04:33:04+5:30
स्वच्छता लघुपट स्पर्धेत दोन वेगवेगळ्या भागांतील विषयात लघुपटाची निर्मिती करून स्पर्धकाने वैध व सक्रिय ई-मेल आयडीसह हा लघुपट यूट्यूबवर ...
स्वच्छता लघुपट स्पर्धेत दोन वेगवेगळ्या भागांतील विषयात लघुपटाची निर्मिती करून स्पर्धकाने वैध व सक्रिय ई-मेल आयडीसह हा लघुपट यूट्यूबवर स्पर्धेच्या अर्जासह २० जुलै २०२१ पर्यंत सादर करावा. स्पर्धेसाठी भाग-१ करिता हगणदारीमुक्त लघुपट निर्मिती करायची आहे. यासाठी जैव-विघटनशील कचरा व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, वर्तणूक बदल आदी विषय आहेत. यासाठी प्रथम पुरस्कार १ लाख ६० हजार रुपये, द्वितीय ६० हजार रुपये, तृतीय पुरस्कार ३० हजार रुपये ठेवण्यात आला. भाग-२ साठी भौगोलिक परिस्थितीवर आधारित लघुपट निर्मिती करावयाची आहे. यासाठी विषय- वाळवंट क्षेत्र, डोंगराळ प्रदेश, सागरी किनारपट्टी लगतचा प्रदेश, मैदानी भाग, पूरप्रवण क्षेत्र हे देण्यात आले. याकरिता प्रथम पुरस्कार २ लाख रुपये, द्वितीय १ लाख २० हजार रुपये, तृतीय ८० हजार रुपये, असे असणार आहे. स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पचारे यांनी केले आहे.