कोरपना ग्रामीण रुग्णालय येथे सॅनिटायझर मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:26 AM2021-05-22T04:26:09+5:302021-05-22T04:26:09+5:30

कोरपना : तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव बघता कोरपना तसेच परिसरात तापाची मोठ्या प्रमाणात साथ सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा ...

Sanitizer machine at Korpana Rural Hospital | कोरपना ग्रामीण रुग्णालय येथे सॅनिटायझर मशीन

कोरपना ग्रामीण रुग्णालय येथे सॅनिटायझर मशीन

Next

कोरपना : तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव बघता कोरपना तसेच परिसरात तापाची मोठ्या प्रमाणात साथ सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे सॅनिटायझर मशीन कार्यान्वित करण्यात आली आहे.

माजी आमदार ॲड. संजय धोटेमार्फत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे भाजप शाखा अध्यक्ष अनिल कवरासे यांनी सॅनिटायझर मशीनची मागणी केली होती. त्यांनी लगेच ही मागणी पूर्ण करून दिली. सॅनिटायझर मशीनचा लोकार्पण नुकताच पार पडला. भाजप जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर, डॉ. पुरी, डॉ. घाटे, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल कवरासे, तुळशीराम डोहे, विलास पारखी, निवृत्ती डोहे, ज्ञानेश्वर मडावी, धोंडू उईके, ज्ञानेश्वर देरकर आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Sanitizer machine at Korpana Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.