संजय डोर्लीकर राष्ट्रीय सन्मानाचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 11:16 PM2019-01-07T23:16:32+5:302019-01-07T23:16:50+5:30

राष्ट्रीय शैक्षणिक योजना तथा प्रशासन संस्था, नवी दिल्लीतर्फे संपूर्ण देशभरातून उत्कृष्ट शैक्षणिक व प्रशासकीय कार्य करणाऱ्या शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना राष्ट्रीय सन्मान देऊन गौरव करण्यात आले. यात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी भरीव कामगिरी करुन संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळा शंभर टक्के डिजीटल करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. या कार्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांना सन २०१७-१८ चा राष्ट्रीय सन्मान बहाल करण्यात आला.

Sanjay Dorlikar honors national honor | संजय डोर्लीकर राष्ट्रीय सन्मानाचे मानकरी

संजय डोर्लीकर राष्ट्रीय सन्मानाचे मानकरी

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील माध्यमिक शाळा शंभर टक्के डिजीटल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राष्ट्रीय शैक्षणिक योजना तथा प्रशासन संस्था, नवी दिल्लीतर्फे संपूर्ण देशभरातून उत्कृष्ट शैक्षणिक व प्रशासकीय कार्य करणाऱ्या शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना राष्ट्रीय सन्मान देऊन गौरव करण्यात आले. यात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी भरीव कामगिरी करुन संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळा शंभर टक्के डिजीटल करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. या कार्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांना सन २०१७-१८ चा राष्ट्रीय सन्मान बहाल करण्यात आला.
जिल्ह्यातील माध्यमिक शाळा नोव्हेंबर २०१७ मध्येच शंभर टक्के डिजीटल झाल्या. या कार्यात तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, तत्कालीन उपसंचालक अनिल पारधी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांचे सहकार्य मिळाले. या कार्यासोबत चंद्रपूर जिल्ह्यात बरेच विद्यार्थी शाळाबाहय असल्याचे निदर्शनास आले. याचा शोध घेण्यासाठी शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी एक नवीन उपक्रम सुरु केला. प्रत्येक शाळेत शाळाबाहय विद्यार्थी दाखवा व मुख्याध्यापक यांच्याकडून एक हजार रुपये मिळवा, अशा प्रकारचे फलक लावण्यात आले. त्यामुळे शाळाबाहय मुलांची संख्या कमी झाली.
या विधायक कार्याबद्दल शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांना शुक्रवारी निपा नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावळेकर तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालन सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय सन्मान देऊन गौरविण्यात आले. या सन्मान सोहळयात देशभरातून ४९ अधिकाºयांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातून शिक्षणाधिकारी (मा.) संजय डोर्लीकर यांचा समावेश होता.
येन्सा येथील अंगणवाडीला पुरस्कार
केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते वरोरा तालुक्यातील येन्सा येथील अंगणवाडी सेविका अंजली बोरेकर यांना राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील प्रवासी भारतीय भवनात हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास राज्यमंत्री डॉ. विरेंद्र कुमार व सचिव राकेश श्रीवास्तव उपस्थित होते. अंगणवाडी सेविका बोरेकर यांनी विविध जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या राबवले.

Web Title: Sanjay Dorlikar honors national honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.