‘लोकमत’ची स्पर्धा परीक्षेवरील लेखमाला विद्यार्थ्यांसाठी संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:31 PM2017-08-25T23:31:42+5:302017-08-25T23:32:02+5:30

लोकमतने सुरु केलेल्या स्पर्धा परीक्षेवरील लेखमाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खरोखरच संजीवनी ठरली आहे, ....

Sanjivani for students of 'Lokmat' contest exams | ‘लोकमत’ची स्पर्धा परीक्षेवरील लेखमाला विद्यार्थ्यांसाठी संजीवनी

‘लोकमत’ची स्पर्धा परीक्षेवरील लेखमाला विद्यार्थ्यांसाठी संजीवनी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण : लोकमतने सुरु केलेल्या स्पर्धा परीक्षेवरील लेखमाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खरोखरच संजीवनी ठरली आहे, असे प्रतिपादन पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र सोनवने यांनी केले.
जिवती तालुक्यातील पाटण येथील ‘आर्मी दी बेस्ट, पोलीस भर्ती पूर्व प्रशिक्षण’च्या पटांगणात ‘लोकमत’च्या स्पर्धा परीक्षेवरील लेखमालेचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमी दी बेस्ट पोलीस भर्ती पूर्र्व प्रशिक्षणाचे अध्यक्ष भिमराव पवार, सचिव दिनेश जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य बाबूजी उईके, दीपक आत्राम आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकमतच्या लेखमालिकेचे प्रकाशन करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच लोकमतच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच लोकमतने सुरु केलेला हा उपक्रम येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांना लाभदायक असल्याचेही प्रतिपादनही वक्त्यांनी केले. यावेळी प्रशिक्षणातील विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आर्थिक चणचणीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी महागडे पुस्तक व इतर शिकवणी वर्ग लाऊ शकत नाही. त्यामुळे लोकमतने सुरु केलेली स्पर्धा परीक्षेवरील लेखमाला विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे.
- भीमराव पवार, उपसरपंच ग्रामपंचायत पाटण

Web Title: Sanjivani for students of 'Lokmat' contest exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.