सर्पमित्राने नागांना दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:27 AM2020-12-22T04:27:02+5:302020-12-22T04:27:02+5:30

सावरगाव : येथील सर्पमित्र घृष्णेश्वर बोरकर यांनी सावरगाव येथील तीन जणांच्या घरुन नाग सापाला पकडून जीवनादन दिले. तिन्ही विषारी ...

Sarpamitra gave life to the snakes | सर्पमित्राने नागांना दिले जीवदान

सर्पमित्राने नागांना दिले जीवदान

Next

सावरगाव : येथील सर्पमित्र घृष्णेश्वर बोरकर यांनी सावरगाव येथील तीन जणांच्या घरुन नाग सापाला पकडून जीवनादन दिले. तिन्ही विषारी सापांना आलेवाही वनविभागाच्या बिटातील जंगलात सुरक्षितरित्या सोडून जीवदान देण्यात आले.

शासकीय कार्यालयात तक्रारपेट्याची मागणी

गोंडपिपरी : शासकीय कार्यालयातील कामकाज व कर्मचाऱ्यांबाबत अनेकांच्या तक्रारी असतात. काही व्यक्ती त्या प्रत्यक्ष सांगू शकत नाही. त्यासाठी प्रत्येक कार्यालयात तक्रारपेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र तक्रारपेट्या गायब असल्याने लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

उपरी-पेठगाव रस्त्याची दुरुस्ती करावी

सावली : तालुक्यातील उपरी ते भान्सी-पेठगाव रस्त्याची दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

प्रलंबित समस्या सोडविण्याची मागणी

ब्रह्मपुरी : शहरातील वर्षानुवर्षे रखडलेल्या मूलभूत समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली जात आहे. विद्यानगरी म्हणून ब्रह्मपुरी शहराची ओळख सर्वदूर आहे. मात्र शहरातील समस्या अद्यापही कायम असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. नगर परिषद अस्तित्वात आली. तेव्हापासून समस्या जटील व गुंतागुंतीच्या होत गेल्या, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

चराई क्षेत्र कमी झाल्याने शेतकरी हैराण

चंद्रपूर: दिवसेंदिवस चराई क्षेत्र कमी होत असल्याने शेतकºयांना गुरांच्या चाºयाचा प्रश्न पडला आहे. ग्रामीण भागात सध्या शेती हंगाम सुरु आहे. मात्र चराई क्षेत्र नसल्याने गुरांना चरण्यासाठी नेतांना त्यांना अडचण निर्माण होत आहे. त्यातच काही भागात बिबट तसेच वाघाची दहशत असल्याने इकडे आड, तिकडे विहिर अशी काहीशी अवस्था शेतकºयांची झाली आहे. वन विभागाने निस्तार हक्कअंतर्गत शेतकºयांना चराईचे क्षेत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे.

परवान्याशिवाय चालवितात वाहन

चंद्रपूर : तालुक्यात दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत आहे. मात्र, अनेकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना नाही. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी ठराविक दिवशी शिबिर आयोजित केले जाते. शिवाय, जिल्हा कार्यालयात ही व्यवस्था कायमस्वरुपात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी विना परवाना वाहन न चालविता परवाने प्राप्त करूनच वाहन चालविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेड नसल्याने

प्रवाशांचे बेहाल

मारोडा : मारोडा येथील रेल्वस्थानकावर शेड नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. शेड नसल्यामुळे पावसात ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे येथे शेड उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी

चिमूर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने स्वच्छतेवर विशेष भर दिला आहे. अनेक गावांमध्ये शिबिरेसुद्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र सध्या गावांमध्ये सर्वत्र अस्वच्छता दिसत आहे. विशेष म्हणजे, काही गावांतील नागरिक शौचालयाचा वापर न करता रस्त्याच्या कडेलाच जात असल्याने दुर्गंर्धी निर्माण झाली असून आरोग्यही धोक्यात आले आहे. त्यामुळे मोहीम राबविण्याची मागणी आहे.

जिवती कोरपना वरोरा बसफेरी सुरु करा

कोरपना : जिवती येथून धनकदेवी, कोरपना, वणीमार्गे वरोरा बस सेवा नसल्याने मोठी अडचण जात आहे. त्यामुळे बसफेरी सुरू करण्यात यावी, अशी मागणी समाज सुधारक फाऊंडेशन व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

वाहतूक पोलिसाची मागणी

चंद्रपूर : रामनगर-दाताळा मार्गावर वाहतूक वाढल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सोबतच या रस्त्यावर समोर एमआयडीसी असल्याने तेथील कामगारही याच रस्त्याने जात असतात. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या चौकात वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी आहे.

जनावरांना लसीकरण करण्याची मागणी

जिवती: तालुक्यातील बहुतांश नागरिक शेती करतात.अनेक शेतकºयांजवळ पाळीव जनावरे आहेत. पावसाळ्यात विविध प्रकारचे रोग होऊ नये, यासाठी लसीकरण मोहीम सुरू करावी़ ग्रामपंचायतींना यात सहभागी करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे़

बिनबा वॉर्डात

घाणीचे साम्राज्य

चंद्रपूर : बिनबा वॉर्डात विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या भागात नियमित स्वच्छता होत नाही, असा आरोप नागरिक करीत आहेत. मातंग मोहल्ला व बिनबा वॉर्डातील नाल्याचा उपसा होत नाही. त्यामुळे नाल्या तुडुंब भरल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरली असून डासांचे प्रमाण वाढले

गतिरोधकाअभावी अपघाताचा धोका

सावली : सावली-गडचिरोली या मुख्य मार्गावरील चौकात गतिरोधक नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला. चंद्रपूर-गडचिरोली हा मुख्य मार्ग असून वाहनांची वर्दळ असते. सावली परिसरातील खेडी ते चकपिरंजी या रस्त्यावर एकही गतिरोधक नसल्याने या मार्गावर अनेकांचे अपघात झाले आहे. त्यामुळे मार्गासोबत शहराला जोडणाºया मार्गांवर गतिरोधक बांधण्याची मागणी केली आहे.

कर्जासाठी सुशिक्षितांची अडवणूक

गडचांदूर : शासकीय नोकºयांचे प्रमाण कमी झाल्याने सुशिक्षित बेरोजगार व्यवसाय करण्यासाठी आतुर आहेत. मात्र, भांडवल उभारण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुद्रा योजनेसाठी कागदपत्र सादर करून संबंधित अधिकारी लक्ष देत नाही. त्यामुळे युवकांमध्ये नाराजी आहे. बँकांनी बेरोजगार युवकांची अडवणूक न करता कर्ज मंजूर करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

Web Title: Sarpamitra gave life to the snakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.