निराधार, विधवा महिलांसाठी ‘सरपंच आधार योजना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 06:00 AM2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:00:46+5:30
या योजनेची घोषणा तालुका क्रीडा संमेलनात जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश वारजूकर यांच्या यांनी केली. यंदापासून निराधार विधवा महिलांसाठी सरपंच आधार योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गावातील निराधार, एकल, विधवा महिलांना आजीवन एक हजाराचे अर्थसहाय्य दिल्या जाते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार व माजी आमदार अविनाश वारजुकर यांच्या हस्ते नऊ महिलांना एक हजारांचा धनादेश ग्रामपंचायतकडून प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शंकरपूर : मनात इच्छाशक्ती आणि नवीन संकल्पना असेल तर योजनेमध्ये रूपांतर करून यशस्वीरित्या राबविता येऊ शकते हे शंकरपूर ग्रामपंचायतीने सिद्ध करून दाखविले. यंदापासून ग्रामपंचायतीने निराधार विधवा महिलांसाठी ‘सरपंच आधार योजना’ ही नाविण्यपूर्ण योजना सुरू केली. ही योजना राज्यासाठीही पथदर्शी ठरणार असल्याचा दावा ग्रामपंचायतीने केला आहे.
या योजनेची घोषणा तालुका क्रीडा संमेलनात जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश वारजूकर यांच्या यांनी केली. यंदापासून निराधार विधवा महिलांसाठी सरपंच आधार योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गावातील निराधार, एकल, विधवा महिलांना आजीवन एक हजाराचे अर्थसहाय्य दिल्या जाते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार व माजी आमदार अविनाश वारजुकर यांच्या हस्ते नऊ महिलांना एक हजारांचा धनादेश ग्रामपंचायतकडून प्रदान करण्यात आला. ही अभिनव योजना शंकरपूर ग्रामपंचायत आपच्या सामान्य फंडातून राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
नाविण्यपूर्ण योजनेत आघाडी
याआधी ग्रामपंचायतीने राधा योजना यशस्वीरित्या राबवली होती. या योजनेनुसार ज्यांच्या घरी पहिली मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या नावाने ३ हजारांचे अर्थसहाय्य १८ वर्षांपर्यंत बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करण्यात आले. या योजनेची दखल तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलास देशमुख यांनी घेतली होती. राज्य सरकारने सुकन्या योजना राबवल्याने ग्रामपंचायतने ही योजना बंद केली. अशी योजना राबविणारी शंकरपूर ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली होती.