सरपंच, उपसरपंचाविना ग्रामपंचायत पोरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:17 AM2018-02-02T00:17:40+5:302018-02-02T00:17:56+5:30

नऊ सदस्य असलेल्या चिरोली ग्रामपंचायतीमध्ये ना सरपंच आहे ना उपसरपंच. या दोन्ही महत्त्वाच्या पदाविना ही ग्रामपंचायत पोरकी झाली असून त्याचा गावविकासावर विपरित परिणाम होत आहे.

 Sarpanch, Deputy Panchavina Grampanchayat Poruki | सरपंच, उपसरपंचाविना ग्रामपंचायत पोरकी

सरपंच, उपसरपंचाविना ग्रामपंचायत पोरकी

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासकीय कारभार : चिरोलीचे सरपंच पायउतार, उपसरपंचपदही रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : नऊ सदस्य असलेल्या चिरोली ग्रामपंचायतीमध्ये ना सरपंच आहे ना उपसरपंच. या दोन्ही महत्त्वाच्या पदाविना ही ग्रामपंचायत पोरकी झाली असून त्याचा गावविकासावर विपरित परिणाम होत आहे.
नळ जोडणी प्रकरणी राज्य शासनाने सरपंच शालिक दहीवले यांना जुलै २०१७ रोजी सरपंच पदावरून पायउतार करण्यात आले. पंचायत समितीने ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक केली आहे. त्यामुळे सरपंचपद सहा महिन्यांपासून तर उपसरपंच पद मागील दीड वर्षांपासून रिक्त आहे. यामुळे सरपंच, उपसरपंचाविना ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे.
चिरोली ग्रामपंचायतची निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. नऊ सदस्य संख्या असलेल्या चिरोली येथील वार्ड क्र. १ मधून शालिक बोळना दहीवले निवडून आले होते. सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने शालिक दहीवले यांची सरपंचपदी निवड झाली तर अनिल शेंडे यांची उपसरपंचपदी निवड झाली होती.
दरम्यान, अनिल माधव शेंडे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याने गावातील नागरिकांनी त्यांची आयुक्तांकडे तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा करून अनिल शेंडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप खरे निघाल्याने आयुक्तांनी दीड वर्षापुर्वी अनिल शेंडे यांना ग्राम पंचायत सदस्य आणि उपसरपंच पदावरून खाली केले. दरम्यान, नळ जोडणीचे पैसे ग्रामपंचायतीमध्ये भरणा न केल्याच्या कारणावरून शालिक दहीवले यांना सरपंच पदावरून ग्राम विकास मंत्रालयाने जुलै २०१७ रोजी पायउतार केले. तेव्हापासून ही ग्रामपंचायत पोरकी झाली आहे. त्यामुळे विकास खुंटला आहे.
अधिसुचनेनुसार उपसरपंचाची निवडणूक लावू - तहसीलदार
येत्या २५ फेब्रुवारी रोजी चिरोली ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्र. २ ची सदस्य पदाची पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक झाल्यानंतर शासनाच्या अधिसूचनेनुसार चिरोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक लावू, अशी प्रतिक्रिया मूलचे तहसीलदार राजेश सरवदे यांनी दिली.

Web Title:  Sarpanch, Deputy Panchavina Grampanchayat Poruki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.